समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल, मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडीओवर जरांगे-पाटलांचा इशारा
आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं,बोलून मोकळं व्हायचं.हो.. हा व्हिडीओ राज्यभर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर मराठा समाजामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.सरकारला समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, सरकारला आपण एक महिन्याचा वेळ दिलेला आहे. त्यामुळे बोलून मोकळं व्हायचं की काय, ते बघू. जर हे सत्य असेल तर सरकारला समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल.इच्छा नसतानाही आम्ही एक महिन्याचा वेळ सरकारला देत आहोत. त्यामळे तिघांनीही अशी विधानं करु नयेत,नसता समाजाची दिशाभूल करणं महागात पडेल,असा इशाराही दिला आहे.