शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 (11:09 IST)

दोन समाजात तेढ निर्माण केली का: नितेश राणे

महाराष्ट्रात मराठा व दलित समाजात तेढ निर्माण करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा सरकारचा हा मोठा कट आहे. मात्र हे आम्ही विरोधक म्हणून कदापी होऊ देणार नाही. मराठा आरक्षणाबाबत 29 मोर्चे होऊनही शासनाने काहीच केलेले नाही त्यामुळे आता आमची सहनशक्ती आता संपली आहे. शासनाला मुकमोर्चाची भाषा समजत नसेल तर आम्हाला आता भाषा बदलावी लागेल तर, होणारा उद्रेक शासनाला न पचणारा असेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. 
 
जिल्हा रूग्णालयात पीडीत बालिकेच्या कुटुबियांशी चर्चा केल्यानंतर गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहावर राणे पत्रकारांशी बोलत होते.