रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (08:45 IST)

आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात मराठी क्रांती मुक आंदोलनाला १६ जूनपासून सुरुवात होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी होत असलेल्या 'मराठा क्रांती मूक आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहेत. 
 
छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे देखील कोल्हापूरला जाणार आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाला आणखी बळ मिळणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली होती.
 
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली होती. आंदोलनाच्या आधी त्यांनी  शाहू समाधीस्थळावरुन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व आंदोलनाचा आढावा घेतला.