शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (08:06 IST)

१६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे, संभाजीराजेंना आवाहन

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील सर्व संघटना व नेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्या आण्यासाठी मी पुढाकार घेतो आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यातील संघटनेच्या एकत्रित बैठकीला यावे अशी मी विनंती करणार आहे. तर दुसरी विनंती त्यांनी आंदोलन पुढे ढकलावे ही करणार असल्याचे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, मी आज किंवा उद्या संभाजी महाराजांशी बोलणार आहे. समनन्वयाची माझी भूमिका आहे. विनायक मेटे, संभाजी महाराज यांना देखील एकत्रित आणायचा माझा प्रयत्न आहे. राज्यात २३ संघटना काम करत आहेत. मग भूमिका वेगळी का असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी सगळी ताकद एकत्रित आण्यासासाठी माझा प्रयत्न असेल. सगळे एकत्र येऊन आठवड्या भरात बैठक घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्दावर नाशिक येथे आयोजित बैठकीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळे ते म्हणाले की समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठका घेतो आहे. राज्यभरातील समाजबांधवांना बोलावण्यात आले होते.आंदोलनाच्या भविष्यातील रणनीती बाबत चर्चा केली. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावे असे मी आवाहन केले होते. लोणीला याबाबत बैठक झाली. सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. समाजातील आमदार खासदारांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका. पहिले सगळ्या संघटनांना एकत्र आणणार मग आमदार खासदारांना एकत्र आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.