गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (08:06 IST)

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उदयनराजेंना भेटणार : संभाजीराजे

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी उदयनराजेंना भेटणार असल्याचे खासदार संभाजी छत्रपती यांनी जाहीर केले. तसेच मराठ्यांच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही ताकदपणाला लावली पाहिजे अशी मागणी संभाजी राजेंनी केली आहे.सकल मराठा समाजाच्या समन्वयकांशी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 
 
यावेळी बोलताना संभाजी राजे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेला जनतेला कोण वेठीस धरतेयं हा प्रश्न साऱ्या पुढाऱ्यांनाच विचारा. छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला आहे मी आजपर्यंत कोणालाच वेठीस धरले नाही हा माझा रेकॉर्ड आहे. विषय साधा आणि सरळ आहे की, कोणाच्या विरोधात आमचा लढा नाही. आमचा लढा मराठ्यांच्या प्रश्नांना, समाजाला न्याय मिळवून द्या. न्यायमूर्ती भोसले यांनी अहवाल देण्याआधीच आम्ही आमच्या मागण्या मांडल्या होत्या. मराठा समाजांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी फक्त महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही एकत्र येत महाराष्ट्राची तिथे ताकद लावयला पाहिजे. ”असेही त्यांनी सांगितले.