आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले, बैठकीत स्लॅब कोसळले
पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे आज थोडक्यात बचावले.ते आज प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सह्याद्रीच्या अतिथीगृहात बैठक घेत असताना मुख्य सभागृहातील मोठे झुंबर पीएओपी स्लॅब्सह कोसळले.
आज शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अचानक झालेल्या या अपघातात कोणतीही मोठी जीवित हानी झालेली नाही.
मात्र ही दुर्घटना जीवघेणी होती.त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहात सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.घटनेनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मोठ्या अधिकाऱ्यांना तेथून ताबडतोब सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.