शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 जून 2021 (18:36 IST)

मुंबईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला

आज मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.अंमली पदार्थ विरोधक पथकाला ला हा साठा एका 50 वर्षीय महिले कडून मिळाला आहे.त्या महिले कडून तब्बल तीन कोटी आठ लाख दहा हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असून सदर महिलेला अटक करण्यात आली आहे.
 
ही महिला देशातली अंमली पदार्थ विकणारी सर्वात मोठी सप्लायर असल्याचे सांगण्यात आले आहे.अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या या महिलेला अंमली पदार्थांच्या साठा सह मुंबईतील काळबादेवी अशा प्रसिद्ध आणि हायप्रोफाईल परिसरातून अटक करण्यात आले आहे.या महिलेचे आंतरराष्ट्रीय गटाशी देखील संबंध असल्याची चर्चा केली जात आहे. सदर महिला त्या परिसरात एक साधी गृहिणी म्हणून वावरत असल्याचे सांगितले जात आहे.
 
तिच्या संशयास्पद वागणुकीमुळे तिच्या बाबतची माहिती पोलिसांना मिळाली असताना पोलिसांनी तिच्या विरोधात कारवाई करून महिलेकडून 1 किलो 27 ग्रॅम हेरॉईन मोठ्या प्रमाणात जप्त  केले.तिला हे अंमली पदार्थ महाराष्ट्राच्या बाहेरून पुरवत असल्याची माहिती देखील मिळाली आहे.त्याच बरोबर ही महिला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे या मोठमोठ्या शहरात देखील अंमली पदार्थ पुरवत असल्याचे सांगितले जात आहे.
महिले वर पोलिसांनी पदार्थ विरोधी कायदा 1985 कलम 8 कलम 21 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.   
सध्या सर्वत्र मिळालेल्या या यशाबद्दल मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांसह अंमली पदार्थ विरोधी पथकातील सदस्यांवर मोठं कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.