गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (16:24 IST)

बाप्परे, वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव 2 दिवसापासून बेपत्ता आहेत. वसई विरार महापालिकेत मागच्या एक वर्षांपासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता. प्रेमसिंग जाधव यांनी सहाय्यक आयुक्त पदावरून वसई विरार शहरातील अनेक अनाधिकृत बांधकाम ही भुईसपाट केलेली आहेत. 
 
2 जून रोजी कामावारून सुटल्या नंतर ते घरी परत गेलेच नाहीत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात प्रेमसिंग जाधव बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. 
 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानकातले असल्याचे कळाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रेमसिंग जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.