शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (15:42 IST)

मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन : संभाजीराजे

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातून मराठा समाजाच्या मूक मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी संभाजीराजे यांनी आंदोलन मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनस्थळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक, प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील सहभागी  झाले.
 
आंदोलनस्थळी पोहोचण्या पूर्वी संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील, मराठा समाज दु:खी आहे. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा,” असं संभाजीराजे म्हणाले.