1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
  4. अहमद नगरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा

अहमद नगरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा

Maratha Aarakshan
राज्यातील निघत असलेल्या मराठा महामोर्चा आता विराट मोर्च्यात रुपांतरीत होत असलेल्याचे चित्र असून आज नगर मध्ये मराठा महामोर्चा निघाल आहे. या महामोर्चात खोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीकरिता आजच्या मोर्च्यात निर्भायचे आई वडील सुद्धा सामील झाले आहेत. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. 

अहमदनगरमधील कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर मराठा पेटून उठला आहे.त्यामुळे  आज नगरमध्ये निघालेल्या मोर्चाकडे सर्व पक्ष आणि राजकीय नेत्यांचे आणि सामन्य माणसाचे लक्ष वेधले आहे.
आज  मोर्चात विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे  नेते राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील  सहभागी झाले आहेत.  जिल्ह्याच्या कानाकोप-यातून मराठा समाजातील मंडळी मोठ्या संख्येने नगरमध्ये दाखल होत होती.  भगवा झेंडा, पांढरी टोपी घालून मोर्चेकरी सामील होताना दिसत आहेत. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीचे वडील आणि भाऊ हेदेखील मोर्चात सहभागी झाल्याने या मोर्चाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अहमदनगमरधील शाळा आणि महाविद्यालयांना  सुट्टी देण्यात आली आहे. जवळपास तीन  हजार पोलिस उपस्थित आहेत.  मोर्चासाठी नगरमध्ये ८ वाहनतळ तयार करण्यात आले असून मोर्चात आपातकालीन प्रसंग निर्माण झाल्यास १०० डॉक्टरांचे पथकही सज्ज आहेत.
पुढील लेख
सुभ्रत रॉय जेल मध्ये परत जा - कोर्टाचे आदेश