1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
  4. मराठा मोर्चाचा गांभीर्याने विचार करा - मुंडे

मराठा मोर्चाचा गांभीर्याने विचार करा - मुंडे

राज्यातील विविध भागातील कानाकोपर्‍यातून मराठा समाजाच्या वतीने निघणार्‍या मोर्चांचा केंद्र व राज्य सरकारने वेळीच गांभीर्याने विचार केला नाही तर त्याच्या विपरीत परिणामांना सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी दिला. येथील ‘नाशिक शहर कॅडर कॅम्प’ निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
यावेळी बोलतांना मुंढे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. कोपर्डी प्रकरण ते मराठा मोर्चा या विषयी बोलतांना मुंढे म्हणाले, कोपर्डी प्रकरण राज्य सरकारला योग्य पध्दतीने हाताळता आले नाही. पीडीत महिला कुठल्या धर्माची, जातीची आहे किंवा तिच्यावर अत्याचार करणारा कुठल्या जातीचा यापेक्षा तिच्यावर अत्याचार झाला हे महत्वाचे असून कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारावर जरब बसवणे गरजेचे आहे. सरकार व कायद्यााचा वचक नसल्याने लोकांमध्ये असंतोषाची भावना तीव्र होत आहे. कोपर्डी प्रकरणाविषयी मराठा समाजासह अन्य काही समाजात त्याविषयी संतप्त भावना होती. याशिवाय अन्य काही मुद्दे प्रामुख्याने पुढे येत राहिले. तत्कालीन सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला मात्र विद्यामान सरकारला आपली बाजु न्यायालयासमोर योग्य पध्दतीने न मांडता आल्याने हा मुद्दा चर्चेत आला असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका सर्वश्रृत असून अ‍ॅट्र्रासिटीचा गैरवापर होऊ नये एवढेच आम्हाला वाटते असेही ते म्हणाले. विद्यामान सरकार केंद्रात तसेच राज्यात सत्तेत येत असतांना भ्रष्टाचार, पाकची घुसखोरी यासह अन्य काही महत्वूपर्ण विषयांवर आपली भूमिका मांडत होते. मात्र सत्तेत आल्यानंतर यातील कुठल्याच प्रशद्ब्रााची उकल झाली नाही. राज्य सरकारला सत्तेत येऊन २० महिने झालेत या २० महिन्यात २० मंत्र्यांचे घोटाळे समोर आलेत. पाकची घुसखोरी कायम असून याविषयी जनमानसात खदखद आहे. पालघर येथे कुपोषणामुळे वर्षभरात ६०० बालकांचा मृत्यू झाला. यासह अन्य महत्वपूर्ण विषय सरकारला संवेदनशील पध्दतीने हाताळता न आल्याने जनमानसाचा हा असंतोष विविध माध्यमातून व्यक्त होत आहे.
 
पुढील लेख
लातूर, जालना आणि अकोला येथे मराठा मूक महामोर्चा