1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
  4. लातूर, जालना आणि अकोला येथे मराठा मूक महामोर्चा

लातूर, जालना आणि अकोला येथे मराठा मूक महामोर्चा

कोपर्डी घटनेचा निषेध तसेच मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्या घेत राज्यात लातूर , जालना आणि अकोला येथे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केले होते. याठिकाणी लाखो मराठा बांधवानी आपली हजेरी लावली आहे. मराठा समाजाच्या हा मोर्चा अतिशय शांततेत आणि शिस्तीत पार पडला. कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही.
 
कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये काढण्यात आलेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चात तब्बल १० लाख पेक्षा अधिक  समाज बांधव एकत्र आले. त्यात जवळपास तीन लाख महिला आणि मुलींचा सहभाग होता. लातूरच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा भव्य मोर्चा ठरलाय. हा मोर्चा जिल्हा क्रिडा संकुलाच्या मैदानापासून शिवाजीचौक, पाच नंबर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. 
पुढील लेख
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका लांबणीवर