1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
  4. सातारा : गुंडेवाडी आता मराठानगर

सातारा : गुंडेवाडी आता मराठानगर

राज्यात सुरु असलेल्या मराठा क्रांतीने आतामोठा परिणाम समाज जीवनावर केला आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या गुंडेवाडी या गावाने ठराव करून आपल्या गावाचं नामकरण ‘मराठानगर’ असं केलं आहे. गावाची संख्या १२ पेक्षा अधिक असून, या गावात सर्वच मराठा समाजातील लोक आहेत. 
 
महाराष्ट्रातल्या हजारो पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांच्या अनुषंगाने ठराव केले गेले. यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, शेतीला हमीभाव मिळण्यासाठी स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अरबी समुद्रातील शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे असे ठराव करण्यात आले अश्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत.