Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणपती आरती संग्रह भाग 3

Updated: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (16:04 IST)
दास विनायक मूर्ती पाहुनिया डोले।
मंगलमूर्ती हृदयी राहो हें बाले॥
प्राणी जे गुण गाती ते जाणा तरले।
आपण तरुनी अपुले पूर्वज उद्धरिले॥जयदेव जयदेव ॥३॥
 
 
 
**************************** 
जय जय विघ्नविनाशन जय इश्वर वरदा।
सुरपति ब्रह्म परात्पर सच्चिंद्धन सुखदा॥
हरिहरविधिरुपातें धरुनिया स्वमुदा।
जगदुद्भवस्थितीप्रलया करिसी तूं शुभदा॥१॥
जय देव जय देव जय गणपति स्वामी, श्रीगणपती स्वामी, श्रीगणपती स्वामी।
एकारति निजभावें, पंचारति सदभावे करितो बालक मी॥धृ.॥
यदादिक भूतात्मक देवात्मक तूचि।
दैत्यात्मक लोकात्मविक सचराचर तूंची॥
सकलहि जिवेश्वरादि गजवदना तूंची।
तवविण न दिसे कांही मति हे ममसाची॥जय.॥२॥
अगणित सुखसागर हे चिन्मया गणराया।
बुद् धुदवत् जैअ तव पदि विवर्त हे माया॥
मृषाचि दिसतो भुजंग रज्जूवर वायां।
रजतमभ्रम शुक्तीवर व्यर्थचि गुरुराया॥ जय.॥३॥
अन्न प्राण मनोमय मतिमय हृषिकेषा।
सुखमय पंचम ऐसा सकलहि जडकोशां॥
साक्षी सच्चित् सुख तू अससि जगदीशा।
साक्षी शब्दही गाळुनि वससि अविनाशा॥जय.॥४॥
मृगजलवेत हे माया सर्वहि नसतांची।
सर्वहि साक्षी म्हणणे नसेचि मग तूचि।
उपाधिविरहित केवळ निर्गुणस्थिती साची।
तव पद वंदित मौनी दास अभेदेची॥जय देव.॥५॥
 
 
 
****************************
आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें॥
भक्तीचें भूषण प्रेमसुगंधे अर्पीले॥
अहं हा धूप जाळू गणपतीपुढे॥
माझ्या मोरयापुढें॥
जंव जंव धूप जळे तवं तवं देवा आवडे॥१॥
पंचप्राणहीत धूपदीप जो केला॥
नैवेद्याकारणे उत्तम प्रकार अर्पिला॥
मध्वनाथस्वामी पंचोपचारि पूजीला॥
मग एकार्तीसी प्रेमे प्रारंभ केला॥२॥
 
****************************  
 
त्रिपुरासुर वधु जातां शिव तुजला चिती।
बळिबंधन कराया वामन करि विनंती॥
धाता सृष्टि सृजितां न चले मंदमती।
स्मरण करितां तुझे मग झाली स्फ़ूर्ती॥१॥
जय देव जय देव जयजी गणराया।
हरिहरब्रह्मादिक ते वंदिती तव पाया॥धृ.॥
धरणी धरित मस्तक शेषाला ओझें।
जाहालें तेव्हां स्मरण करि पै तुझे॥
हळुवट पुष्पप्राय घेले गणराजें॥
सुकीर्तीमहिमा घोषे भुवनप्रय गाजे॥ जय.॥२॥
महिषासुरासि वधिता पार्वतिही समरी।
विजया देही म्हणुनी प्रार्थी गौरी॥
गाती मुनिजन योगी सिद्धादिक सौरी।
तुझिया वरदे जिंकिती मन्मथ नरनारी॥जय॥३॥
पंडीत रामात्मज हा कवि किंकर तुझा।
विनवी तुजला भावें पावें निजकाजा॥
ऋद्धीसिद्धीदाता तो स्वामी माझा।
संकट हरुनि रक्षी भक्तांची लज्जा॥जय.॥४॥
 
**************************** 
उपेल जरती मदें शुंडा बहु साजे।
शेंदूर जो घवघवीत अद् भुत सुविराजे॥
घागरियांचा घोळ पदी घुळघुळ वाजे।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे॥१॥
जय देव जय देव गजनरवेषा।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा॥धृ.॥
विशेष महिमा तुजला नकळे गणनाथा।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा॥
अखंड आनंदें तूं डोलविसी माथा।
तांडव नृत्य करिती तातक् धिम ताथा॥जय.॥२॥
विद्या धन संपदा कनकाच्या राशी।
नारी सुत मंदिरे सर्वहि तूं देशी॥
निर्वाणी पावशी वेगी भक्तांशी।
गोसावीनंदन गातो कवितांशी॥जय.॥३॥
 
 
****************************  
वक्रतुंड एकदंत गौरिनंदना।
आरती मी करितों तुज हे गजानना॥धृ॥
 
पाशांकुशा शोभे करी दु:खभंजना।
रत्नजडित सिंहासन बुद्धिदीपना॥ सुरनरमुनि स्मरती तुला यतो दर्शना॥१॥
 
ऋद्धिसिद्धि करिती सद नृत्यगायना। देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना॥
विठ्ठलसुत लीन पदीं विघ्ननाशना। वक्रतुंड एकदंत॥२॥
 
****************************

सर्व पहा

Krishna Janmashtami 2026 Wishes in Marathi श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

गोकुळाष्टमी विशेष नैवेद्य पाककृती: कृष्ण जन्माचा पारंपरिक प्रसाद

मोदकाचा आकार असाच का असतो? बाप्पाच्या आवडत्या नैवेद्यामागे आहे खास अर्थ

श्री कृष्ण जन्माष्टमीपूर्वी या शुभ वस्तू घरी आणा! लाडू गोपाळाचा आशीर्वाद मिळवा

Neem Karoli Baba Blanket नीम करोली बाबा नेहमी स्वतःला घोंगडीत का गुंडाळून ठेवत असत?

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments