गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

श्रीरामाच्या आरत्या

Ram Navami
जय देव जय देव जय आत्मारामा ।
निगमागमशोधितां न कळे गुणसीमा ॥ धृ. ॥
नाना देही देव एक विराजे ।
नाना नाटक लीला सुंदर रुप साजे ॥
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति भाजे ।
अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे ॥ १ ॥
बहुरुपी बहुगुणी बहुतां कलांचा ।
हरिहरब्रह्मादिक देव सकळांचा ॥
युगानुयुगी आत्माराम आमुचा ॥
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥ २ ॥
 
****************************
ऎकावी कथा कानीं राघवाची, माझ्या माधवाची ॥
जेणें भ्रांती हरे सकळही साधकांची ॥ १ ॥
झणी भरी राम आजी गाईला हो ।
डोळे भरुनी राम आजी पाहिला हो ॥ धृ. ॥
रामकृष्ण शिव वाचे आठवा हो ।
ब्रह्मांडनायका ह्र्दयीं साठवा हो ॥झणी. ॥ २ ॥
जन्मा आलिया धन्य तोची दिवस ।
उद्धव चिद्‌घन ह्रदयीं सावकाश ॥झणी भरी॥ ३ ॥
 
****************************
अयोध्या पुरपट्टन शरयूचे तीरी ।
अवतरले श्रीराम कौसल्येउदरीं ॥
स्वानंदे निर्भर होती नरनारी ।
घेऊनि येती दशरथ मंदिरीं ॥ १ ॥
जय देव जय देव जयजी श्रीरामा ।
आरती ओंवाळूं तुज पूर्णकामा ॥ धृ. ॥
पुष्पवृष्टी सुरवर गगनींहुनि करिती ।
दानव दुष्ट भयभित झाले या क्षीती ॥
अप्सरा गंधर्व गायने करिती ।
त्रिभुवनीं आल्हादे मंगलें गाती ॥ जय. ॥ २ ॥
कर्णी कुंडल माथा मुकुट सुविराजे ।
नासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥
विशाळसुकपोली नेत्रद्वय जलते ।
षट्‌पदरुणझुणशब्दे नभमंडळ गाजे ॥ जय. ॥ ३ ॥
रामचंद्रा पाहतां वेधलि पैं वृत्ती ।
नयनोन्मीलन ढाळूं विसरली पातीं ॥
सुरनर किन्निर जयजयकारें गर्जती ।
कृष्णदासा अंतरि श्रीराममूर्ती ॥ जय देव. ॥ ४ ॥
 
****************************
त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळां ।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥ १ ॥
श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा ॥ धृ. ॥
ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम. ॥ २ ॥
भरत शत्रुघ्न दोघे चौऱया ढाळित ।
स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती ॥श्रीराम. ॥ ३ ॥
रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटी ।
आरती ओवाळूं चवदाभुवनांचे पोटी ॥ श्रीराम. ॥ ४ ॥
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूं ते ॥
आरती ओंवाळूं पाहू सीतापतीतें ॥
श्रीराम जय राम जय जय राम ॥ ५ ॥
 
****************************
साफल्य निजवल्या कौसल्या माता ।
जनक सुकन्याऽनन्या मुनिमान्या साती ॥
खेचर वनचर फणिवर भरत निजभ्राता ।
धन्य तो नृपनायक दशरथ पीता ॥ १ ॥
जय देव जय देव जय रविकुळटिळका ।
आरती ओंवाळूं त्रिभुवननायका ॥ धृ. ॥
आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ ।
रकिकुळमंडण खंडण संसारामूळ ॥
सुरवर मुनिवर किन्नर ध्याती पै सकळ ।
धन्य तो निजदास भक्त प्रेमळ ॥ जय. ॥ २ ॥
 
****************************