शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (08:04 IST)

श्री गोपालकृष्ण आरती संग्रह

जयदेव जयदेव वन्दे गोपालम्
मृगमदशोभितभालं भुवनत्रयपालम् जयदेव० ॥ धृ ० ॥
निर्गुणसगुणाकारं संह्रतभूभारं
मुरहरनंदकुमारं मुनिजनसुखकारकम्
वृंदावनसंचारं कौस्तुभमणिहारं करुणापारावारं गोवर्धनधारम् ॥
जय देव० ॥ १ ॥
 
मुरलीवादनलोललं सप्तस्वरगीतम्
स्थलचर-जलचर-वनचररंजित सद्‍गीतम् ॥
स्तंभित यमुनातोयं अगणितवरचरितम्
गोपीजनमनमोहनदान्तं श्रीकान्तम् ॥
जय देव० ॥ २ ॥
 
रासक्रीडामंडलवेष्टीतव्रजललनम्
मध्ये तांडवमंडित कुवलकदलनयनम् ॥
कुसुमित काननरंजित मंदस्मितवदनम्
फणिवरकालियदमनां पक्षीश्वर गमनम् ॥
जयदेव. ० ॥ ३ ॥
 
अभिनव नवनितचोरं विधृतदधिगोलम् ।
लीलानटवरखेलं नवकांचनशैलम् ॥
निर्जररक्षणशीलं विदलितरिपुजालम्
स्वभक्तजनतापालं जय जय गोपालम ॥
जयदेव.० ॥ ४ ॥
 
*********************
 
अवतार गोकुळी हो । जन तारावयासी ॥
लावण्यरुपडे हो ॥ तेज:पुंजाळ राशी ॥
उगवले कोटिबिंब ॥ रवि लोपला शशी ॥
उत्साह सुरवरां ॥ महाथोर मानसी ॥ १ ॥
जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाई कांता ।
आरती ओवाळीन । तुम्हां देवकीसुता ॥ धृ. ॥
कौतुक पहावया ॥ भाव ब्रह्मयाने केली ।
वत्सेंही चोरुनियां सत्यलोकासी नेलीं गोपाल गाईवत्सें ।
दोन्ही ठायी रक्षिलि । सुखाचा प्रेमसिंधु । अनाथांची माउली ॥ २ ॥
चारितां गोधनें हो । इंद्र कोपला भारी मेघ कडाडीला ॥
शिला वर्षल्या धारी । रक्षिले गोकुळ हो ।
नखिं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरला हरि ॥ ३ ॥
वसुदेव देवकीचे । बंद फोडीली शाळा ।
होउनिया विश्वजनिता । तया पोटिंचा बाल ।
दैत्य हे त्रासियेले । समुळ कंसासी काळ ।
राज्य हें उग्रेसेना । केला मथुरापाळ ॥ ४ ॥
तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळुन ।
पांडवा साहाकारी । अडलिया निर्वाणी ।
गुण मी काय वर्णु । मति केवढी वानूं ।
विनवितो दास तुका । ठाव मागे चरणी ॥ ५ ॥
 
*********************
ओंवाळूं आरती मदनगोपाळा ॥
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ धृ. ॥
चरणकमल ज्याचें अति सुकुमार ॥
ध्वजव्रजांकुश ब्रीदाते तोडर ॥ १ ॥
नाभिकमलीं ज्याचें ब्रह्मयाचे स्थान ।
ह्रुदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ २ ॥
मुखकमल पाहातां सूर्याच्याकोटी ॥
मोहियेलें मानस कोंदियली दृष्टी ॥ ३ ॥
जडितमुगुट ज्याच्या दैदीप्यमान ।
तेणें तेजें कोंदलें अवघे त्रिभुवन ॥ ४ ॥
एका जनार्दनीं देखियेले रुप ॥
रुप पाहों जाता झालेसें तद्रूप॥ ५ ॥
 
*********************
 
हरिनाम गोड झाले ॥ काय सांगू गे माये ॥
गोपाळ बहरताती ॥ वेणु आरती पावे ॥ धृ. ॥
गेले होतें वृंदावना ॥ तेथे भेटला कान्हा ॥
गोपाळांसी वेध माझा ॥ छंद लागला मना ॥ १ ॥
आणिक एक नवल कैसे ॥ ब्रह्मांदिकांलागी पीते ॥
उच्छिष्टालागुनियम देव झाले जळीं मासे ॥ २ ॥
आणिक एक नवल चोज । गोपाळांसी सांग गूज ॥
आचवूं जळीचे जीवन ॥ पाहतां नेत्र ते असून ॥ ३ ॥
आणिक एक नवलपरी ॥ करी धरिली सिदोरी ॥
गोपाळांसी वाढीतसे ॥ नामयाचा स्वामी हरी ॥ हरिनाम. ॥ ४ ॥
 
 
*********************

येउन मानवदेहा भुललों संसारी ।
धन सुत जाया माझी म्हणुनीयां सारी ॥
नाही स्मरलो तुजला क्षणही कंसारी ।
वारी भवदु:खातें शरणागत तारीं ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय राधारमणा ।
चुकवी लक्ष योनी चौर्‌यांशी भ्रमणा ॥ धृ. ॥
जाणत आणत आपुले केले अनहीत ।
स्वेच्छें रतलों विषयी त्यजुनीयां विहित ॥
गेला जन्म सज्जनसंगाविरहित ।
त्वपदकमलीं भिनले नाही हे चित्त ॥ जय. ॥ २ ॥
केले अगणित पातक आतां तुज पाही ।
आलो शरणागत मी रक्षी लवलाही ॥
करुणांदृष्टीपूर्ण दोनांतें पाही ।
विनवी कृष्णदास मनिं येऊन राही ॥ जय. ॥ ३ ॥
 
*********************
 
कमलानन खगवाहन मणिभूण शौरी ।
रथ भंजन विमलार्जुनविटपांते मारी ॥
अरिमर्दन मधुसूदन भक्तजना तारी ।
यदुनंदन वज्रमंडन भयभय नीवारी ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय यादवराया ।
न कळे महिमा शेषा मग झाला शय्या ॥ धृ. ॥
 
वज्रवनिता सुखभरिता ध्याती भगवंता ॥
मनमोहन जगजीवन कामाचा जनिता ।
सुरभीसमूहवेष्टित मुरलीस्वर गातां ।
विगलितवसना धावति गोपांच्या वनिता ॥ जय देव. ॥ २ ॥
 
करुणाकर गिरिवरधर वत्सासुरमदना ।
अघशोषण बकनाशक कलियविषहरणा ।
यमुनाजल करि निर्मळ गोगोवळ कान्हा ॥
धरुनी नाना लीला अघटित करि घटना ॥ जय देव. ॥ ३ ॥
 
विष भरुनि स्तनिं दोन्ही ते मातुलभगिनी ।
येउनि बोले कृष्णा पाहिन मी नयनी ॥
उचलुनी घेउनि कडिये लांविता स्तनी ।
शोषुनीं प्राण नेला निजपद सुखसदनी ॥ जय. ॥ ४ ॥
 
कमलासन करि शोधन धरुनि अभिमान ।
गाईगोवळवत्सें नेली चोरुन ।
पुनरपि तैसी देखुनि लज्जायमान ।
जनपंडित शरणागत बोले हरिगण ॥ जय. ॥ ५ ॥
 
*********************
श्रावणकृष्णाष्टमिसी गोकुळिं अवतरले ।
तुमच्या दर्शनमात्रे बहु पापी तरले ।
बाळपणी स्तनपानें पुतना आसु हरिले ।
तुमची अनंतलीला वेदश्रुति बोले ॥ १ ॥
 
जय देवा जय देवा कृष्णा जगपाळा ।
दामोदर गोपाळा बाळा घन नीळा ॥ धृ. ॥
 
देवकिवसुदेवांच्या येउनि उदरासी ।
कंसादिक निर्दाळुनी भक्तां सुख देसी ॥
राहसी स्थिरचर व्यापुनि धर्मासी ।
तुझी अनंतशक्ती न कळे अमरांसी ॥ जय. ॥ २ ॥
 
केशव माधव विष्णू वामन श्रीरंगा ।
नारायण गोविंदा अच्युत अघभंगा ॥
मधुसुदन संकर्षण श्रीपांडुरंगा ।
श्रीधर विरंचि शंभू इच्छित तव संगा ॥ जय. ॥ ३ ॥
 
जगदात्मा गोवर्धनधारी जय कृष्णा ।
गोपीजन मुनीमानसहंसा कुळभूषणा ॥
कृष्णा वस्त्रहरणीं तारिसि सूरहरणा ।
करुणासिंधू सखया पुरवी मम तृष्णा ॥ जय. ॥ ४ ॥
 
शरणागत मी येतों तुझिया चरणांसी ।
आज्ञा दे सर्वज्ञा मज अज्ञानासी ॥
तारी सकळहि संकट वारुनि तम नाशीं ।
पुनरपि येणें चुकवी जननी जठरासी ॥ जय. ॥ ५ ॥
 
भव गज मज बहु जाची दुस्तरगति याची ।
म्हणउनि विष्णू इच्छा करि तव चरणाची ॥
मद‌भय हरि हरि होउनि श्रीहरि मुक्तींची ।
इच्छा पुरवी बापा जननी भक्तांची ॥ ६ ॥
 
*********************
 
वांकी चरणीं धरणी रांगसि यदुतरणी ।
तरुणी मोहिसि फोडिसि भरणी सुखकरणी ॥
पाणी डहुळिसि चोरिसि लोणी मृदुवाणी ।
लोचनबाणें भुलविसी रमणि व्रजरानीं ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय गोकुळपाला ।
नवघननीळा गोपबाळांतें पाळा ॥ धृ. ॥
 
खुळखुळखुळ वाळे घुळघुळ घागरिया ।
क्षुणक्षुण क्षुद्रघंटा वाजति साजितिया ॥
झळझळ पिंपळपान भाळी गोजिरिया ।
अलिकुलकुटील सुनील जावळ सांबळिया ॥ २ ॥
 
दुडुदुडुदुडु रांगसि हांससि मग बससी ।
सस्मितवदने विस्मित मन हरिसी ॥
धरिसी भिंती उठती चालसि मग पडसी ।
दडसी मातेपासीं पंडितप्रभू जडसी ॥ ३ ॥
 
*********************

वृंदारकगुणवृंदं परमामृतकंदं ।
नित्यानंद सुरवरवरदं गोविंद ॥
स्वभक्तमोचितसंधं नाशितभवबंधं मंदस्मितवरमाननमगाध निजबोधं ॥ १ ॥
 
वंदे नंदानंदं तारितमुचुकुंद ॥
वंदितव्रजजनवृंदं तमगाधबोधं ॥ धृ. ॥
 
करुणापारावारं भुवनत्रय सारं ।
जगदाकारं मुक्ताहारं सुखपारं ॥
विश्वाकारं दधिघृतनवनीतहारं ।
सुपतीचीरं श्रीशं वीरं रणधीरं ॥ वंदे. ॥ २ ॥
 
गोपाल तुलसीवनमालं वज्रबालं ।
सनीरनीरदनीलं विधिहरनुतलीलं ॥
विशालभालं गुणगणजालं रिपुकालं ।
मुरलीगायनलीलं पंडितजनपालं ॥ वंदे नंदानंद. ॥ ३ ॥
 
*********************
 
निरसुनि देहत्रय अंतरमंदिरीं ।
महाकारण तेजतुर्या ओंवाळीं ॥
अर्ध मात्रासहित करोनि कूसरी ।
महाराजया तूं सुखनिद्रा करी ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
गोपीरमणातूतें करूं शेजारती ॥ धृ. ॥
 
पुंनाग मोगरे आणिक जुई जाई ।
बकूळ पारिजातक चंपक शेवंती ॥
परिमळद्रव्यें सहित या सुमनावतीं ।
त्यावरि निद्रा करि तूं भुवनत्रयपती । जय देव. ॥ २ ॥
 
या शेजेवरि निद्रा करि देवदेवा ।
लक्ष्मी करित आहे चरणांची सेवा ॥
सत्यभामा विंझाणा वारितसे बरवा ।
माधवदासास्वामी अभय कर द्यावा ॥ जय देव. ॥ ३ ॥
 
*********************
बंधु बलरामासह गोकुळीं अवतरसी ।
मारुनि सकळां दुष्टा भूभारा हरिसी ॥
गोपवधूसी रासक्रीडा बहु करिसी ॥
आत्मज्ञाना कथुनी त्यासहि उद्धरिसी ॥ १ ॥
 
जय कृष्ण जय कृष्ण जय जय कंसांता ।
वंशीवादनयोगें भुलविसी सुरकांता ॥ धृ. ॥
 
सीमा सोडुनि इंद्रें करितां बहु कोप ।
गोवर्धन उचलोनी रक्षिसि गोगोप ॥
लाविसि गोरसरक्षक गोपीला झोंप ।
सर्वहि चोरुनि भक्षिसी वांटिसि अमूप ॥ जय. ॥ २ ॥
 
वाजवुनी मुरलीला रमविसि बल्लीला ।
त्यांसहि यमुनातीरी दाविसि बहु लीला ॥
कंठी घालिसि मोहक सफुल्लवल्लीला ।
स्कंधी घेउनि नाचसि रुसल्या गोपींला ॥ जय. ॥ ३ ॥
 
दमयिसि यमुनाडोही कालीया सर्पा ।
नाचसि फणिवरि थे थे शमविसि तद्दर्पा ॥
गोपीचित्तें हरिसी उभयुनि कंदर्पा ॥
म्हणसी तनुमनधनकृत गर्वहि मज अर्पा ॥ जय. ॥ ४ ॥
 
नमितों तव चरणांतें जनना मरणांतें ।
नासावें श्री कृष्णा आलो शरणातें ॥
काढी दीनदयाळा मायावरणाते ।
मज द्यावें नारायण नामस्मरणातें ॥ जय. ॥ ५ ॥
 
*********************
रजनी करकुल सुंदर देखुनि अवतरसी ।
प्रगटे धरणीधर तो सोदर बहुत रसी ॥
धरुनि सगुणाकारा वज्रजन उद्धरिसी ।
रक्षुनियां वृंदारक असुरातें हरिसी ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय राधारमणा ।
पयसागरतनयावर धाराधरवर्णा ॥
सुंदरवर पीतांबर धारीं मुरहरणा ।
करुणाकर मुरलीधर नमितों तव चरणा ॥ धृ. ॥
 
हस्ती धरुनी मुरली विचरसि गोपृष्ठीं ॥
मुष्टिक चाणुर दामिसि हाणुनि निजमुष्टी ॥
वृष्टी करितां इंद्रें बल्लव बहुकष्टीं ।
दृष्टीं देखुनी धरिसी गिरीवर अंगुष्टी ॥ जय देव. ॥ २ ॥
 
कामा सोडुनि सकळां सत्वर व्रजरामा ।
दामा देती तुजला देखुनि अभिरामा ॥
कामा पुरवुनि त्यांच्या टाळिसि भवभ्रमा ।
मामा मारिसी वारिसी रुक्मिणि आणि भामा ॥ जय. ॥ ३ ॥
 
कालिंदीचे जळीं होता बहुकाळीं ॥
काळीया तो गरळे बहुतांतें जाळी ॥
मौळी त्याच्या रगडति मर्दिसिजैं काळीं ।
गौळी म्हणती विजयी झाला वनमाळी ॥ जय. ॥ ४ ॥
 
मायावेषा धरिसी त्रिजगा सकळा या ॥
गाया करिसी कीर्ती अनुगां सकळा या ॥
देवा इच्छी बल्लव निशिदिनि यदुराया ।
कायावाचामनें नमितों गुरुपायां ॥ जय. ॥ ५ ॥
 
*********************

कोटि कुर्वंडिया माधवपायां ॥
उजळॊं येती यादवराया ॥
मंगल स्नानें घालुनि लवलाह्या ॥
आरत्या करिती अर्पुनिया काया ॥ १ ॥
 
जय जय कृष्णा केशवा पंकजनाभा ।
तन्मय पाहतां लावण्यतेजगाभा ॥ धृ. ॥
 
सजणा व्यजना वारिती गोपीं बाळा ।
एकी उभ्या घेउनी चंपकमाळा ॥
एकी सुमनें रंगल्या गोपीं बाळा ।
एकी पाहती हरीती घनसावळा ॥ जय. ॥ २ ॥
 
दाटी कोटिसुर संगित गायन करिती ।
नारद प्रेमें तुंबर सुस्वर गाती ॥
समाधिबोधें तल्लिन तद्रूप होती ।
ऐसा साजे गोपाळकुळदैवतीं ॥ जय.
 
*********************
हरि चला मंदिरा ऎशा म्हणती गोपिका म्हणती राधिका ।
भावें ओवाळिती यदुकुलतिलका ॥ धृ. ॥
एकीकडे राई, एकीकडे रखुमाई, भावें ओंवाळिता हरिसी तूं होसी दो ठायीं ॥ हरि. ॥ १ ॥
 
अष्टाधिक सोळा सहस्त्र ज्याच्या सुंदरा, ज्याच्या सुंदरा ।
जिणें जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा ॥ हरि. ॥ २ ॥
 
एका जनार्दनी हरि तूं लाघवी होसी ।
इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ॥ हरि. ॥ ३ ॥
 
*********************
आरती भुवनसुंदराची ।
 
इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥
पद्मसमपादयुग्मरंगा ।
ओंवाळणी होती भृंगा ।
नखमणि स्त्रवताहें गंगा जे कां त्रिविधतापभंगा ॥ चाल ॥
वर्तुळ गुल्फ भ्राजमानें ।
किंकिणीक्वणित नाद घणघणित, वांकिवर झुणित, नुपुरें झनन मंजिराची ॥
झनन ध्वनि मंजिराची ॥ आरती. ॥ १ ॥
 
पीतपट हाटकतप्त वर्णी ।
कांची नितंब सुस्थानी ॥
नाभिची अगाध हो करणी ।
विश्वजनकाची जे जननी ॥ चाल ॥
त्रिवली ललित उदरशोभा ।
कंबुगळां माळ, विलंबित झळाळ कौस्तुभ सरळ, बाहु श्रीवत्सतरळमणिमरळ कंकणाची ॥
प्रीति बहु जडित कंकणाची ॥ आरती. ॥ २ ॥
 
इंदुसम आस्य कुंदरदना ।
अधरारुणार्क बिंबवदना ॥
पाहतां भ्रांति पडे मदना ।
सजल मेघाब्धि दैत्यदमना ॥ चाल ॥
झळकत मकरकुंडलाभा कुटिलकुंतली, मयूर पत्रावली वेष्टिले तिलक भाळी केशरी झळाळित कृष्णाकस्तुरींची ।
अक्षता काळि कस्तुरीची ॥ आरती. ॥ ३ ॥
 
कल्पद्रूमातळीं मूर्ती सौदामिनी कोटिदीप्ती ।
गोपीगोपवलय भवती ॥
त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ चाल ॥
मंजुळ मधुर मुरलीनादें ।
चकित गंधर्व चकित अप्सरा, सुरगिरिवरा, कर्पूराधर रतीनें प्रेमयुक्त साची ॥
आरती ओवाळित साची ॥ आरती. ॥ ४ ॥
 
वृंदावनीचिये हरणी ।
सखे गे कृष्ण माय बहिणी ॥
श्रमलों भवब्धिचें फिरणीं ।
आतां मज ठाव देई चरणीं ॥ चाल ॥
अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ॥
नमितों चरण शरण, मी करुणा येऊं दे विषाणपाणी कृष्ण नेणतें, बाळ आपुलें राखि लाज याची ॥
दयानिधे राखि लाज याची ॥ आरती ॥ ५ ॥
 
*********************
सुमनाचे शेजेवरी । पहुडली रमाहरी ॥
वास घाली ते सुंदर । आरती देवी ॥ धृ. ॥
 
अब्जोद्‍भाव सदाशिव । शेष ऋषीगण गंधर्व आदिकरुनी सर्व देव ॥
नमिताती देवा ॥ १ ॥
 
पुढें उभा गदा पाणी । करितसे विनवणी ॥
सर्वही जिवांची करणी । सांगतसे देवा ॥ २ ॥
 
जे जे ज्यांही सेवा केसी ॥ ते ते देवानें घेतली ॥
सर्वांवरी दया केली । देवाधिदेवा ॥ ३ ॥
 
जे जे ज्यांचे मनोरथ । ते ते पुरवी श्रीनाथ देऊनि प्रसाद तीर्थ ॥
केले रे सुखी । ४ ॥
 
देव ऋषी मानव । पुण्यश्लोक दानव ॥
सर्वांचा ही गौरव । केलासी देवा ॥ ५ ॥
 
ऎसिये मंचकसेवा । नयनी पाहिली रे देवा ॥
प्रियोत्तमाहूनि सर्वां । जाहले वरिष्ठ ॥ ६ ॥
 
गणपतितातांचे रे पुण्य । पुण्यक्षेत्रवरदान टिमया करी सेवन ॥ ७ ॥
 
 
*********************

सुमनाचे शेजेवरी । पहुडली रमाहरी ॥
वास घाली ते सुंदर । आरती देवी ॥ धृ. ॥
 
अब्जोद्‍भाव सदाशिव । शेष ऋषीगण गंधर्व आदिकरुनी सर्व देव ॥
नमिताती देवा ॥ १ ॥
 
पुढें उभा गदा पाणी । करितसे विनवणी ॥
सर्वही जिवांची करणी । सांगतसे देवा ॥ २ ॥
 
जे जे ज्यांही सेवा केसी ॥ ते ते देवानें घेतली ॥
सर्वांवरी दया केली । देवाधिदेवा ॥ ३ ॥
 
जे जे ज्यांचे मनोरथ । ते ते पुरवी श्रीनाथ देऊनि प्रसाद तीर्थ ॥
केले रे सुखी । ४ ॥
 
देव ऋषी मानव । पुण्यश्लोक दानव ॥
सर्वांचा ही गौरव । केलासी देवा ॥ ५ ॥
 
ऎसिये मंचकसेवा । नयनी पाहिली रे देवा ॥
प्रियोत्तमाहूनि सर्वां । जाहले वरिष्ठ ॥ ६ ॥
 
गणपतितातांचे रे पुण्य । पुण्यक्षेत्रवरदान टिमया करी सेवन ॥ ७ ॥
 
*********************
परमानंदा परम पुरुषोत्तमा रामा ।
अच्युत अनंता हरि मेघश्यामा ॥
अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा ।
अकळकळा कमलापति ना कळे महिमा ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय जय श्रीपती ।
मंगेळशुभदायका करीन आरती ॥ धृ. ॥
 
गोविंद गोपाळा गोकुळरक्षणा ।
गिरिवरधर भवसागर तारक दधिमंथना ॥
मधुसुदन मुनिजीवन धरणींश्रमहरणा ।
दीनवत्सला सकळां मूळ जयनींधाना ॥ २ ॥
 
विश्वंभर सर्वेश्वर तूं जगदोद्धारा ।
चक्रधर करुणाकर पावसी गजेंद्रा ॥
सुखसागर गुणआगर मुकुटमणी शूरां ।
कल्याण कैवल्यमूर्ति मनोहरा ॥ जय. ॥ ३ ॥
 
गरुडासना शेष शयना नरहरीं ।
नारायणध्याना सुरवर हर गौरी ॥
नंदानंदवंदित त्रिभुन भीतरीं ।
अनंत नामीं ठसा अवतारावरीं ॥ जय. ॥ ४ ॥
 
सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंता संता ।
भगवान भगवंता काळ कृतांता ॥
उत्पतिपाळण पासुनि संहारणसत्ता ।
शरण तुकयाबंधु तारी बहुतां ॥ जय. ॥ ५ ॥
 
*********************
दैत्यभारें पिडली पृथिवी बाळा ।
म्हणवुनि तुला येणें लागे गोपाळा ॥
भक्तप्रतिपालक उत्साह सोहळा ।
मंगळ तुजला गाती नर आणि अबला ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय गरुडध्वजा ।
आरती ओंवाळूं तुज भक्तकाजा ॥ धृ. ॥
 
गुण रुप नाम नाही जयासी ।
जिवीताची तैसा होसी तयासी ॥
मत्स्य कूर्म वराह नृसिंह झालासी ।
असुरां काळा ऎसा पुढें टाकसी ॥ २ ॥
 
सहस्त्रनामरुपें सावळा ना गोरा ।
श्रुति नेति नेति म्हणति तुज विश्वंभरा ॥
जीवना जीवन तूंची होसी दातारा ।
न कळें पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥ ३ ॥
 
संता महंता घरी म्हणवी म्हणियारा ।
शंख चक्र गदा आयुधांच्या भारा ॥
दिव्य सुदर्शन घरटी फिरे अवसरा ।
सुकुमार ना स्थूल होसी गोजीरा ॥ ४ ॥
 
भावेंविण तुझें न घडे पूजन ।
सकळहि गंगा झाल्या तुजपासून ॥
उत्पत्ति प्रलय तूचि करिसी पाळण ।
धरुनि राहिला तुका निश्चयी चरण ॥ जय देव. ॥ ५ ॥
 
*********************
कंसराये गर्भ वधियेले सात ।
म्हणउनि गोकुळासी आले अनंत ॥
घ्यावया अवतार हेंचि निमित्त ।
असुर संहारोनी तारावे भक्त ॥ १ ।
 
जय देव जय देव जय विश्वरूपा ।
ओंवाळूं तूंते देहदीपें बापा ॥ धृ. ॥
 
स्थूल होउनि रुप धरिसी तूं सानें ।
जैसां भाव तैसा तयां कारणें ॥
दैत्यासी भाससी सिंहगर्जमानें ।
काळा महाकाळ यशोजे तान्हें ॥ २ ॥
 
अनंतवर्णी कोणा न कळेंची पार ।
सगुण कीं निर्गुण हाही निर्धार ॥
पांगली साही अठरा करितां वेव्हार ।
तो वळितसे गवळीयाचें खिल्लार ॥ जय. ॥ ३ ॥
 
तेतिस कोटी तीन्ही देवांसी श्रेष्ठ ।
पाउलें पाताळीं स्वर्गी मुगूट ॥
गिळिलीं चवदा भुवने तरिं न भरे पोट ।
खाउनि घालासे गोपालोच्छिष्ट ॥ ४ ॥
 
महिमा वर्णूं तरी पांगलीया श्रुती ।
शेषजिव्हा किरल्या करितां पै स्तुती ॥
भावेंवीण काही न चलेची युक्ती ॥
राखें शरण तुकया बंधू करि विनंती ॥ जय. ॥ ५ ॥
 
*********************

जय बासूरिया तूंते कृपाळा करितों ही आरती ॥ धृ. ॥

माधव हे वामना मधुसूदन यदुराया ।
ब्रह्मादिक सूर प्रेमानंदें वांच्छिताति तव पायां ॥
जय दीनदयाळा तूंतें कृपाळा ॥ जय. ॥ १ ॥
 
जगदात्मा हे केशवा गोविंदा जगपाला ।
बाळपणी स्तनपानें पूरनां वधियलीं तत्काल ॥
जय व्रजगोपाळा तूंतें कृपाळा ॥ २ ॥
 
विठ्ठलात्मजे ध्यातसे धाव आतां मम माय ।
मद्वय हरीं हरीं सदय होऊनि मुक्तीचा दे ठाय ॥
जय भक्तवत्सला तूंतें कृपाळा ॥ ३ ॥
 
*********************
नंदयशोदाबाला कुटिलालकजाला ।
मृगमद तिलकित भाला अधमुर मधुकाला ॥
द्युतिनित तरुण माला दमित विष व्याला ।
गोपी गोधनपाला धृत सुमनो माला ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय राधाकृष्णा ।
पूर्णब्रह्म सनातन हतनत जनतृष्णा ॥ धृ. ॥
 
कृतकलिश मलध्वंसा पीनविल सदंसा ।
बर्हिण पिच्छावंतसा कविजन कृतशंसा ॥ जय देव जय देव. ॥ २ ॥
 
*********************
कंसवधार्य धरातल धरिली भक्तांच्या ।
उद्धारार्थ जगद्‌गुरु होसी विश्वाचा ॥
श्रमले चारी शास्त्रें भ्रमल्या मनवाचा ।
तो तूं गोकुळनायक साक्षीं त्रिजगाचा ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय आदीपुरुषा ।
अहिविषमदहरणा श्रीगोविंद परेशा ॥ धृ. ॥
 
विश्वविद्यासागर निशिदिनि तत्पर तूं ।
शशिकविकामित सहस्त्र युवतीजन पति तूं ॥
गोवर्धनधर कौतुक गुरुसुतदायक तूं ।
सुरनरकिन्नर मुनिजन शंकरह्रुदयी तूं । जय. ॥ २ ॥
 
निजशरणांगत रक्षक नंदघरी नटतां ।
गोपीजन मनमोहन करिसी वन अटतां ॥
उद्धव पार्था ज्ञानें तारिसि भव असतां ।
तरला गणकात्मज कविलक्ष्मींधर जपतां ॥ ३ ॥
 
*********************
श्यामल वर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।
आरती करितों बहु प्रेमानें भवभयसंकट दूर करी ॥ धृ. ॥
 
दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी ।
भक्त काज कल्पद्रुम म्हणुनी निशिदिनीं ध्याती भक्त तुशीं ॥
अतिविधर जो काळा फणिवर कालिय यमुना जलवासी ।
तत्फणिवर तूं नृत्य करुनी पोंचविलें त्या मुक्तींसी ॥ १ ॥
 
कैटभ चाणुर कंसादिक हें शौर्ये वधिले अमित अरी ।
नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिती लीला बहुत परी ॥
अपार महिमा श्रवण करोनी भजती त्यातें मुक्त करी ।
दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी ॥ २ ॥
 
*********************

जयजयजी कृष्णनाथ रुक्मिणीवरा ।
पंचारति करितों तुज तारिपामरा ॥ धृ. ॥
 
गोकुळांत जन्मुनियां भक्त तारिले ।
सजलजलदरुप तुझे केवि शोभले ॥
तेजें तव भानुशशी खचित लोपले ॥
उत्सव बहु थोर मनी जाहला सुरां ॥ जय ॥ १ ॥
 
माव करुनि विधिनें गो गोवत्सें चोरिली ।
कौतुकाने सत्य लोकि अवधि लपविंलीं ॥
दोन्हिं ठाई गोवत्सें तूचि दाविली ।
न कळे तव पार कदा निगममंदिरा ॥ जयजयजी. ॥ २ ॥
 
वसुदेव देवकीचा बाळ म्हणविला ।
मुक्त करुनि पितृबंध कंस मर्दिला ॥
उग्रसेन मथुरेचा भूप स्थापिला ।
दुष्ट दैत्य मर्दियेले भक्तभवहरां ॥ जय. ॥ ३ ॥
 
सन्मार्गी भक्तजना लाविसी खरा ।
निशिदिनि जें ध्याती त्यां तारिसी पुरा ॥
दास विनवि हे तुजला इंदिरावरा ।
बलवंता भजनप्रेम दे गदाधरा ॥ जय. ॥ ४ ॥
 
*********************
प्रभुवर जय जय जय देव गीत गोविंद ।
प्रबंधभूत नंदितन तमुह्रदरविंद ॥ धृ. ॥
 
श्रीमद्रावा मति रतिनति नुतिपरवद्दनं ।
सेवे त्वां ललिता दिकवर लीलासदनं ॥
नानालक्ष व्रजभूललनार तिललित ।
रासरसं कलपंतं नवरस संवालितं ॥ १ ॥
 
सिद्धाष्टा पदीरुपा अनुभव दातार: ।
किंवा सिद्धा: केशव मुखमूर्त्या कारा: ॥
बहुविधवर्णा अथवा तत्वानां निकरा ।
भजंति परमं त्वां बुधपर मानंदकरा: ॥ प्रभू ॥ २ ॥
 
त्वां सेवंते भक्ता मुक्ता अति सक्ता गतसारे संसारेऽपिच मुक्तयनुरक्ता: ।
सर्व भवंति वांछित फलिनो बहुमालिनो बहु मालिनोऽनं तोपाध्याय सुता भवतुवर बलिन: ॥ ३ ॥
 
*********************
निर्गुण सगुणाकारं सह्रतभ मारं मुरहर नंदकुमारं मुनिजन सुखकारं ।
 
वृंदावन संचारं कौस्तुभ मणिहारं ॥
करुणापारा वारं गोवर्धन धारं ॥ १ ॥
 
जय देव जय देव वंदे गोपालं ।
मृगमद शोभितभालं भुवनत्रय पालं ॥ धृ. ॥
 
मुरली वादनलालं सप्त स्वरगीतं ।
स्थलचर जलचर वनचररजित सन्दीतं ।
स्तंभित यमुना तोयं अगणित वचारतं ।
गोपींजन मनमोहन दांतं श्रीकांतं ॥ जय. ॥ २ ॥
 
रासक्रीडा मंडल वेष्ठितव्रज ललनं ।
मध्ये तांडव मंडित कुवलय दलनयनं ॥
कुसुमित कानन रंजित मंदस्मित वदनं ।
फणिवर कालिय दमनं एक्षीश्वर गमनं ॥ जय देव. ॥ ३ ॥
 
अभिनव वनित चोरंकर धृतदाध गोलं ।
लीलानट सेलं धृतकांचन चैल ॥
निजरक्षण शीलं विदलितरि पुजालं ।
स्यभक्त जनतापालं जय जय गोपालं ॥ जय. ॥ ४ ॥
 
*********************
कुंददंत मंदहासय नंदनंदना ।
पंचारति करितो तुज कंसकंदना ॥ धृ. ॥
गोपसख्या कोप टाक पाहि नतजनां ।
 
करी कृपा कृपावणवा ॥
बाळकृष्ण विठ्ठलास रक्षिं सज्जना ॥ कुंद दंत. ॥ १ ॥
 
*********************

करुणाकर गुणसागर गिरिवर धरदेवे ।
लीला नाटकवेष धरिला स्वभावें अगणित गुणलाघव हें कवणाला ठावे ॥
व्रजनायक सुखदायक काय मी वर्णावें ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय राधारमणा ।
आरती ओंवाळूं तुज नारायणा ॥ धृ. ॥ जय. ॥ १ ॥
 
वृंदवनहरिभुवन नूतन तनु शोभे वक्रांगे श्रीरंगे यमुनातटिं शोभे ।
मुनिजन मानसहारी जगजीवन ऊभे ॥
रविकुळ टीळक्रदास पदरज त्या लोभे ॥ २ ॥
 
*********************
आरती कुंजबिहारीकी । गिरिधर कृष्ण मुरारीकी ॥ धृ. ॥
 
गलेंमें वैजयंतीमाला । बाजवे मुरली मुरलिवाला ॥
श्रवणमें कुण्डल जगपाला । नंदेके नंदही नंदलाल ॥
घनसम अंगकांति काली । राधिका चमक रही बिजली ॥
भ्रमरसम अलक । कस्तुरीतिलक चंदसि झलक ललित सब राधें प्यारीकी ॥ गिरी. ॥ १ ॥
 
कनकमय मोरमुगुठ बिलसे । देवतादर्शनको तरसे ॥
गगनसे सुमन बहुत बरसे । चंद्रिका शरदृष्टी हरसे ॥
चंहु फेर ख्याल गोपधेनु । ब्रज हरि जमुनातटरेणु ॥
हंसत मुखमंद । वरद सुखकंद छुटे बहु बंद ।
प्रीत है गोपकुमारीकी ॥ गिरी ॥ २ ॥
 
पीतधृतवसन चरणरागा । लाग रहि गोपी अनुरागा जहांसे निकली भवगंगा ॥
त्रिजगमलहरणीं हरगंगा । रंगसे दंग हुआ मै दास ॥
श्रीधर सदाचरण पास । बचनमो चंग ॥ और मृदंग ।
गवलिनीसंग ॥ लाज रह सब वज्रनारीकी ॥ गिरी ॥ ३ ॥
 
*********************
कोण शरण गेले विधि त्रिपुरहरणा ।
गोरुपा भूदेवांसह दु:खोद्धरणा क्षीराब्धिस्थें कोणीं येऊनियां करुणा ॥
नाभी नाभी गर्जुनी केले अवतरणा ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय मेघश्यामा ।
ब्रह्मचारी म्हणविसी भोगुनियां श्यामा ॥ धृ. ॥
 
पद लाउनि विमलार्जुन कोणीं उद्धरिला ।
क्षणमात्रें दावनल कोणी प्राशियला ॥
बालपणी शकटासुर कोणीं नाशियला ।
बालक देउनि कोणीं गुरु संतोषविला ॥ जय देव ॥ २ ॥
 
वासुदेवासह जातां लावुनिया चरणां ।
कोणीं उथळ केली अवलीळा यमुना ॥
अवतारें अरुणानुज निजवाहन कोणा ।
मोहरिनादें कोणा लुब्ध व्रजललना ॥ जय देव ॥ ३ ॥
 
भोगनियां भोगातित कोणातें म्हणती ।
भारत भागवतवादी कोणाची ख्याती ॥
ऎसा तूं परमात्मा परब्रह्ममूर्ती ।
एकाजनार्दनह्र्दयीं ध्याता हे चित्ती ॥ जयदेव ॥ ४ ॥
 
*********************
आरती नंदलाला । व्रजवासी गोपाला ॥
करी कंजवाणी लीला । भक्तिभाव फुलविला ॥ धृ. ॥
 
शिरी पिच्छ मयुरांचे कंठी रुळे वनमाळा ॥
सावळे रुप कैसे । मुग्ध करी जगताला ॥ १ ॥
 
भगवंत बालरुपे । आला नंदाचिया घरां ॥
बाल-गोपाल संगे । खेळे नाचे प्रेमभरा ॥ २ ॥
 
घुमे नाद मुरलीचा । जणु वाचा प्रेमाची ॥
हारवी देहबुद्धि । साद घाली भक्तीची ॥ ३ ॥
 
खूण ही अंतरीची । एक राधा उमगली ॥
गोविंद नाम घेतां । स्वये गोविंद झाली ॥ ४ ॥
 
सान, थोर भेद-भांव । विरलेची हरीनामी ॥
निरसेच मोहमाया । चित्त चैतन्य कामी ॥ ५ ॥
 
संकटीं रक्षी सर्वा । सान बाळ नंदाचे ॥
गणेश दास्य याची । नित हरि-चरणाचे ॥ ६ ॥
 
*********************
श्रीकृष्ण गोविंद गोपाळ राधे । ओवाळूं आरती मंगळानंदें ॥धृ०॥
 
रोहिणीसुत बळिराम अनंत । अनंत श्रीकृष्ण हा भगवंत ।
अनंत पुण्याचें फळ हें सुबुद्धें ॥ओवाळूं० ॥१॥
 
ब्रह्म सनातन भक्‍तपरायण । आला तुझ्या गृहीं अदि नारायण ।
धन्य तुझें बाई भाग्य यशोदे ॥ओवाळूं० ॥२॥
 
धुंडितां सकलही ब्रह्मांड सृष्टी । न पडेचि हा रवि-चंद्राचे दृष्टीं ।
नाढळे जपतप श्रुतिशास्त्रवादें ॥ओवाळूं० ॥३॥
 
सकळही गोपी गोपाळ गवळी । आनंदें येऊनि कृष्णाचे जवळीं ।
गर्जती जयजय मंगळवरदे ॥ओवाळूं० ॥४॥
 
श्रावण अष्टमी प्रति कृष्णपक्षीं । गर्जती श्रीकृष्ण जयकृष्ण पक्षी ।
सुरवर मुनिजन गोधन-वृंदें ॥ओवाळूं० ॥५॥
 
गोकुळीं जन्मला हरी चक्रपाणी । जाहलें निश्‍चळ यमुनेचें पाणी ।
वाजती करटाळ मृदंग वाद्यें ॥ओवाळूं० ॥६॥
 
केशव माधव हे मधुसुदना । पंकजनेत्रा सुप्रसन्न वदना ।
दावी निरंतर चरणारविंदें ॥ओवाळूं० ७॥
 
जन्मला पुरुषोत्तम विश्‍वस्वामी । आनंदली सर्व पाताळ भूमी ।
जगीं धन्य विष्णूदास प्रसादें ॥ओवाळूं० ८॥
 
*********************