अभंग 1
जन्माचें तें मूळ पाहिले शोधून।
दु:खासी कारण जन्म घ्यावा ।।1।।
पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी।।
नरदेहा येवुनी हानी केली ।।2।।
रजतमसत्व आहे ज्याचे अंगीं ।।
याच गुणें जगीं वाया गेला।।3।।
तम म्हणजे काय नरकचि केवळ।।
रज तो सबळ मायाजाळ।।4।।
तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य।।
करवी परमार्थ अहर्निशीं।।5।।
दु:खासी कारण जन्म घ्यावा ।।1।।
पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी।।
नरदेहा येवुनी हानी केली ।।2।।
रजतमसत्व आहे ज्याचे अंगीं ।।
याच गुणें जगीं वाया गेला।।3।।
तम म्हणजे काय नरकचि केवळ।।
रज तो सबळ मायाजाळ।।4।।
तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य।।
करवी परमार्थ अहर्निशीं।।5।।

