1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. आरती संग्रह

कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे

ND
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे
शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।
घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे । ।1।।

जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ।।धृ।।

विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा ।
अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।
ताण्डनृत्य करिसी तातक् धिम ताथा ।।जय।।2।।

विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।
नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।
निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।
गोसा‍वीनंदन गातो कवितांशी ।।जय।।3 ।
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा