- धर्म
» - हिंदू
» - आरती संग्रह
दुर्गा आरती
दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी।अनाथ नाथे अम्बे करुणाविस्तारी।वारी वारी जन्म मरणांते वारी।हारी पडलो आता संकट नेवारी ।।1।।जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।सुरवर ईश्वर वरदे तारकसंजीनी ।।धृ।।तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही।चारी श्रमले परंतु न बोलवे काही।साही विवाद करिता पडले प्रवाही।ते तू भक्तालागी पावसि लवलाही ।।।।।2।।प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा। अम्बे तुजवाचून कोण पुरवील् आशा। नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।3।।-
नरहरी सोनार