मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (14:53 IST)

कुंभ राशी भविष्यफल 2019

कुंभ राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार वर्षभर मिळणारी दशमस्थानातील गुरूची साथ व इतर अनुकूल ग्रहस्थितीमुळे येत्या वषर्शत तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. कुंभ ही शनीची वायू तत्वाची रास आहे. उत्तम बुद्धिमत्ता लाभलेली, वैचारिक पातळीवर नेहमीच न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरणारी, समंजसपणा, दयादृष्टी राखून न्यायाचा चौकटीत जगणारी आणि अन्यायाचा बीमोड बुद्धीच्या जोरावर करून तितक्याच आत्मीयतेने स्वत:चं पापभीरू मन जपणारी रास आहे. वर्षभर शनीची कृपादृष्टी या राक्षला लाभणार आहे. तसेच वर्षभराच्या सुरुवातीला रवी, राहू आणि शुक्राचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. मात्र मंगळ गुरूकडून निर्माण होणारा विरोध फारसा विपरीत परिणाम करू शकणार नाही. पण गुरूच्या प्रेरणेतून मिळणारा संयम आणि प्रोत्साहन कुठेतरी हरवल्यासरखे वाटेल. पण जीवन प्रवासात आणि विशेषत. ग्रहांच्या या पुढेमागे होणार्‍या फेर्‍यात असे घडणार हे गृहीत धरावे लागेल. 
 
कौटुंबिक जीवन
29 जानेवारीला लाभात येणारा शुक्र अडचणी सोडवून त्यातून सोपा मार्ग काढतील. मात्र मंगळाच्या या नीतीचा राग करून कुणाशीही सूडभावनेने वागू नका. त्यामुळे शत्रूंची संख्या वाढून मनस्तापात भर पडेल. पंचमातील राहूचे राश्यांतर घरगुती समस्या, मुलांचे शिक्षण, नातेवाईकांच्या अपेक्षा असा गुंता निर्माण करेल. सांसारिक जीवनातील ताणतणाव हळूहळू कमी होतील. पूर्वी ठरलेले शुभसमारंभ जानेवारीपर्यंत पार पडतील. फेब्रुवारी ते जून या दरम्यान खर्च वाढतील. जूननंतर एखादी चांगली घटना घडेल, पण व्यक्तिगत जीनवात एकाकीपणा जाणवेल. हे वर्ष तुमच्या साठी उत्तम असेल. कौटुंबिक जीवन सामान्‍य असेल.कुटुंबात कुठला क्षण असा येईल जो कधी ही आपण विसरू शकणार नाही. नातेवाईक घरी येतील. त्याच येण जाण चालू असेल. वैवाहिक जीवनात कसले त्रास उत्पन्न होणार नाहीत. मार्च नंतर परिस्थिति आणखी चांगली होईल. 
 
आरोग्य
या वर्षात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सुदृढ आणि उत्साही असाल. तुमच्यात खूप उत्सुकता, तळमळ आणि प्रचंड उर्जा राहील. या वर्षी आरोग्या बाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. पोटा वर लक्ष द्यावे. या वर्षी स्वास्थ्य आणि शंतता मिळणे दुरापास्त होईल. शुक्राचा प्रवास खूपच आनंदी, उत्साही असेल पण मंगळाच्या अष्टमातील प्रवेशातून वेगाने वाहन चालवणे, रस्त्यातून चालताना मोबाइलवर बोलणे या गोष्टी टाळाव्यात. तसेच प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. 
 
करियर
या वर्षात तुमच्या करिअरला उंची प्राप्त होईल. तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या निर्णयांमुळे तुमचे करिअर अधिक चांगेल होईल. तुम्ही तुमच्या उत्तम निर्णायमुळे तुमच्यासाठी चांगल्या संधी तयार कराल. तुमचे आर्थिक आयुष्य उत्तम राहील. या वर्षी तुमची प्रोफेशनल लाइफ खूप उत्तम राहणार आहे. तुम्हाला किती तरी नवीन अवसर मिळतील. तुमच्या करियर साठी खूप छान वेळ आहे. तुम्ही आपल्या क्षेत्रात 
आपले नाव लौकीक करताल. व्‍यापारा साठी चांगली वेळ आहे. व्‍यापारी वर्गाला चांगली डील मिळू शकते. भरपूर पैशे काम्व्ताल. चांगला नफा होईल. कुठली मोठी डील करू शक्ताल. कुठल्या नवीन जागी किंवा देशात आपला व्यापार वाढवू शक्ताल. पार्टनरशिप मध्ये काम करण्याचे योग उत्पन्न होत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास आणि चांगले यश संपादन करण्यास उत्तम वर्ष आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशीही जाता येईल. कलाकार खेळाडू व राजकारणी व्यक्तींना स्वत:ची प्रतिमा निर्माण करता येईल.
 
व्यवसाय
या वर्षात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची खूप शक्यता आहे. तुम्हाला धनप्राप्ती झाल्याने तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल. त्याचप्रमाणे या वर्षभरात संपत्ती संचय उत्तम प्रकारे कराल. मार्च महिन्यानंतर आर्थिक परिस्थितीत उत्तरोत्तर सुधारणा होत जाईल. उत्पन्नाचे विविध मार्ग असतील आणि आर्थिक आघाडीवर तुम्ही समाधानी असाल. या वर्षी आर्थिक स्थिति तुमची उत्तम असेल व बचत देखील होईल. बैंक बैलैंस वाढेल. स्‍टॉक किंवा गोल्‍ड मध्ये निवेश करू शकताल व या पासून खूप पैसा कामवताल. सट्टा लावून देखील पैशे चांगले कमवताल. जुलै ते सप्टेंबर हा कालावधी खर्चिक पण तुमच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल. नवीन कामात गती येईल. तुमचे एखादे स्वप्न साकार होईल. सप्टेंबरनंतर तुमच्या कामाला नशिबाची जोड लाभल्यामुळे आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर वाढेल. मात्र द्वितीय स्थानात येणारा मंगळ आर्थिकबाबतीत अडचणी निर्मार करेल. त्यात दिलेला शब्द पाळताना काहीशी कसरत करावी लागेल.
 
रोमांस 
या वर्षी तुमचे शृंगारिक आयुष्य अधिक चांगले राहील. २०१९ या वर्षाच्या राशी भविष्यानुसार या वर्षाची सुरुवात काहीशी संथ असेल. मार्चपर्यंत तुमच्या शृंगारिक आयुष्यात चढ-उतार अनुभवाल. असे असले तरी या कालावधीत तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. तुमच्या साठी हे पूर्ण वर्ष उत्तम असेल. सिंगल लोकांना या वर्षी त्यांचे प्रेम मिळेल. पूर्ण वर्ष प्रेमाच्या आनंदात व्यतीत होईल. मार्च महिन्या नंतर थोडे सावध राहण्याची गरज आहे. गैरसमज उत्पन्न झाल्या मुळे नात तुटण्याची संभावना आहे. कुठल्या विधवा किंवा तलाकशुदा महिला बरोबर शरीरिक संबंध बनू शकतील. तरुणांनी विवाहाचे बेत सप्टेंबरनंतर योजावेत.
 
उपाय
आपल्या कुळ दैवताची पूजा करावी. दररोज सकाळी 20 मिनट ध्‍यान आणि प्राणायाम जरूर करावे.