गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (15:11 IST)

तुळ राशी भविष्यफल 2019

तुळ राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार या वर्षी तुळ राशीला गुरू शनीचा शुभ सहवास पूर्ण वर्षभर लाभणार आहे. विनयशील बोलणे, उत्तम विचार यामधून एक वेगळीच आपुलकी निर्माण होईल. गुरूचे धनस्थानातील भ्रमण, शनीचे तृतीय स्थानातील वास्तव्य आणि मंगळ, बुध, शुक्र या सर्व शुभग्रहांचा तुम्हाला मिळणारा आहे. शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये  मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील.
 
कौटुंबिक जीवन
काही बाबतीत तुमचा अपेक्षाभंग होईल. तुम्ही या कालावधीत आनंदी असाल आणि गृहसौख्य लाभेल. या वर्षाच्या मध्यावर आनंददायी बातमी तुम्हाला खुश करेल. या वेळी तुमच्या घरी शुभ कार्य घडेल. तूळ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सामान्य राहील. कुटुंबात कुठला उत्‍सव किंवा समारोह साजरा केला जाईल जो लक्षात राहण्या जोगा असेल. घरातील लोकां बरोबर कुठे फिरायला जाल. या वर्षी तुमच्या घरी पाहुण्यांचं येण-जाण चालू असेल. घरात लग्न किंवा लहान बाळाचा जन्म होऊ शकेल. काहींना दूरचे परदेशगमन योग येतील.
 
आरोग्य
वर्षभरात तुमचे आयुष्य चांगले राहील. या वर्षी तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभेलच, त्याचबरोबर दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या आजारांपासूनही मुक्त व्हाल. या वर्षी आरोग्या बाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही.कमरेत किंवा पायात दुखेल. छातीत त्रास होतील. प्रवासात आरोग्य सांभाळा. विशेषत: मूत्राशयाच्या आजाराची तसंच खोट्या आरोपात अडकणार नाही याची काळजी घ्या.

करियर
आर्थिक बाबतीत तुम्हाला नशीबाचीसुद्धा साथ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. मार्चनंतर तुमच्या नव्या कल्पना तुम्हाला यश मिळवून देतील. या कालावधीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. पण ते तुमच्या अपेक्षेनुसार नसेल. त्यामुळे त्यांच्यावर आंधळेपणाने विसंबून राहू नका. मार्च नंतर तुमच्या करियर चा वेग वाढेल परंतु तुम्ही जास्त आनंदी राहु शकणार नाही. शेवटच्या क्षणी निराशा हाती लागेल. वेळे वर काम पूर्ण करू शकणार नाही. कार्य प्रदर्शन खराब होईल. कामात उशीर होण्याची संभावना आहे. तुम्हाला समजणार नाही कि तुमच्या जवळपास काय घटीत होत आहे. केतुची दशा असणाऱ्या लोकां साठी चांगली वेळ आहे. सहकर्मी बरोबर ताळमेळ बसणार नाही. कलाकार, खेळाडू आणि राजकारणी मंडळी मोठ्या पदाचे मानकरी ठरतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश संपादन करून उच्चशिक्षण देशात किंवा परदेशात घेता येईल.
 
व्यवसाय
आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. पार्टनर बरोबर तुमची समज चांगली असेल आणि दोघां मध्ये सगळे काही चांगले असेल. या वर्षी कुठले नवीन काम सुरु करताल. मार्च नंतर तुमच्या कामात तेजी येईल. कामात चांगली सफळता मिळेल. सेल्‍स किंवा मार्केटिंग मध्ये तुम्ही कुठले रेकॉर्ड तोडू शकता. या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. पैशा बाबत कसलीही काळजी करण्याची गरज नाही. नातेवाईक आणि मित्रांची मदत मिळेल. बैंक बैलेंस उत्तम राहणार आहे. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष तुमच्या साठी उत्तम असणार आहे. मार्च ते जून आर्थिकदृष्टया तणावग्रस्त टप्पा असेल. जुलैपासून पुन्हा एकदा प्रगतीचा आलेख उंचावेल. परदेश व्यवहारांना चालना मिळाल्याने ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमारास विदेशात फेरफटका होईल. सप्टेंबरनंतर तुमच्याच व्यवसायाशी निगडित देदीप्यमान कामगिरी बाजवून तुम्ही स्वत:ची ऐक वेगळी प्रतिमा निर्माण कराल.
 
रोमांस
2019 सालच्या ग्रहमानानुसार या वर्षी तुम्ही नवे नाते जोडाल. जोडीदाराशी असलेले तुमचे नाते परिपूर्ण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत पर्यटन कराल. त्याचप्रमाणे तुम्ही दोघे एकत्रितपणे मौजमजा कराल. रोमांस साठी हे वर्ष उत्तम असणार. प्रेम संबंधात कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. सिंगल लोकांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरले जातील. या नात्या मुळे तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण पाहायला मिळतील. वेगळ्या धर्मातील किंवा खालच्या जातीच्या व्यक्ती बरोबर संबंध बनू शकतील.
 
उपाय
सकारात्‍मक विचार ठेवावेत आणि मानसिक दृष्ट्या संतुलित राहावे.