बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2019 (15:33 IST)

जून 2019तील भविष्यफल

मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ) 
कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा. भागीदारीच्या कामांमध्ये सावध राहा. संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. वेळेची मागणी आहे की तुम्ही सावधानी बाळगावी. प्रवास करण्याआधी इश्वराचे स्मरण नक्की करा. वाहन चालवताना दक्ष राहा. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. एखादी शुभ बातमी कळेल. शत्रू तुमच्या बेजबाबदार वागण्याचा फायदा 
उचलतील. आर्थिक पातळीवरही परिस्थिती सामान्य राहील. 
  
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) 
योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. आपला वाईट काळ संपला आहे. जुन्या कामाचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल. आपण नव्या कामाचा शुभारंभही करू शकता. मित्र आपल्याला मदत करतील. हो, पण कोणावरही डोळे मिटून भरवसा ठेवू नका, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. आणि हो, कुटुंबात लहान-मोठ्या समस्या उद्भवू शकतात. पण आर्थिक बाजू मजबूत राहील.
 
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा) 
आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. कोणालाही उधार देण्यापासून सावध राहा, नाहीतर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. अपेक्षित परिणाम मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मिळकतीतील वृद्धीने आर्थिक बाजू सुदृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे 
ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही. 
 
सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे) 
आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल.  कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी योग्यरीत्या पडताळणी करा. तुमच्या वागण्यामुळे आसपासच्या लोकांना त्रास होऊ शकतो. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. इतरांच्या प्रकरणात उगीचच नाक खुपसू नका. हा महिना तुमच्यासाठी मिळता-जुळता असणार आहे. डॉक्टरकडे जाणे होऊ शकेल. 
 
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)
इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतिम आहे. मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. धार्मिक कार्यात रूची वाढेल. एखाद्या धार्मिक क्षेत्राची यात्रा घडू शकते. एखादा नवा व्यवहार ठरवताना कागदपत्रांची योग्यरीत्या शहानिशा करून घ्या. नव्या जबाबदाया तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. महिनाअखेरीस काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात. 
 
तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)
गंभीरपणे विचार केलात तर  एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या जोडीदाराबरोबर उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष विचलीत करतील. थोडा नीट विचार करुनच कोणत्याही कामात हात टाका. नव्या कामाची सुरुवात करण्याआधी प्रत्येक पैलूची आधीच माहिती मिळवणे आवश्यक आहे. कोर्ट-कचेरींपासून दूर राहणे ठीक होईल. कोणालाही उधार देणे टाळा, कारण यात तुमचे पैसे बुडू शकतील. 
 
वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. सर्व प्रयत्नांतीही काम होईलसे दिसणार नाही, मेहनतीच्या तुलनेत फळ मिळणार नाही. जोडीदाराशी आपले वागणे ठीक राहणार नाही. आई-वडिलांच्या प्रसन्नतेची पूर्ण काळजी घ्या. अपत्यांकडूनही चांगली बातमी समजणार नाही. शत्रू हावी राहतील. 
 
धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे) 
आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. चाकरमान्यांना लाभ मिळेल. तुमच्यासाठी काहीतरी रचनात्मक करण्याची वेळ आली आहे. कला आणि साहित्यांशी संबंधित लोकांसाठी अनुकूल वेळ आहे. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. 
 
मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली करा. धन लाभ होण्याचे योग. सासरकडून साहाय्य. मित्रांसोबत शहराबाहेर फिरण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. तुम्ही जे मेहनतीचे रोप आधी रोवले होते त्याची फळे खाण्याची वेळ आली आहे. पण घाई-गडबडी करू नका नाहीतर पश्चाताप करावा लागेल. भौतिक सामान खरेदी केल्याने वैभवात वाढ होईल. शत्रूंना वाटूनसुद्धा तुमचे नुकसान करता येणार नाही. 
 
कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द) 
आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. साहित्यिक क्षेत्रातील लोकांसाठी वेळ खूप चांगली आहे. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. नव्या नोकरीची संधी आहे. शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे योग आहेत. कायदेशीर बाबी त्रास देऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून दूरच राहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. 
 
मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची) 
अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. पैसा खर्च होईल. एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. धन जरा संभाळून खर्च करा. तुमची बेपर्वाई तुमचे नुकसान करू शकते. कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. हा ब्रेक तुम्हाला गरजेचा आहे. कारण याने तुम्ही ताजेतवाने व्हाल आणि तुमच्या भविष्यासाठी तयारी करू शकाल. जोडीदाराचे वागणे खटकणारे असेल. तुमचा राग त्यात आणखी भर टाकू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बाहेर खाणे टाळा.