सोप्या वास्तू टिपा, आपलं जीवन बदलतील, अमलात आणू तर बघा
अनेकदा घरात विनाकारणी कटकटी, वाद, भांडण होत असतात. सर्व सुविधा, पैसा, सुख असलं तरी ते भोगायला देखील भाग्य लागतं. सर्व व्यवस्थित असलं तरी घरात कुणाशी कुणाचं पटतं नाही, उगाचच्या वादावादी आणि संताप निर्माण होत असेल तर निराश न होता एकदा वास्तु निगडित काही सोपे उपाय करुन बघा. उपाय जे अगदी सोपे आणि सहजरित्या करता येतील. असे म्हणतात की सोपे उपाय केल्याने नात्यातील कडूपणा दूर होतो, नकरात्मकता दूर होते. तर जीवन सुखा- समाधानाने व्यतीत करायचे असेल तर एकदा हे उपाय अमलात आणून बघायला हरकत तर काय. तर आज आम्ही प्रस्तुत करत आहोत अगदी सोपे 15 वास्तु उपाय
* घरा आठवड्यातून एकदा गूगलचा धुर करणे शुभ ठरतं.
* गव्हात नागकेशराचे 2 दाणे आणि तुळशीचे 11 पान टाकून गहू दळवणे देखील शुभ ठरतं.
* घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाकणे देखील शुभ असतं.
* प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या झाडाला दूध अर्पित करावे.
* दररोज तव्यावर पोळी शेकण्यापूर्वी दूधाचे शिंतोडे मारणे शुभ ठरेल.
* तसेच पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी.
* घरात 3 दारं एकाच रेषेत नसावे. आणि असं असल्यास एक दारं नेहमी बंद ठेवावं.
* वाळलेले फुलं देवघरात किंवा घरात देखील नसावे.
* संत-महात्मा यांचे आशीर्वाद देत असलेले चित्र बैठकीत लावावे.
* घरात तुटके- फुटके, अटाळा, फालतू वस्तू ठेवू नये.
* दक्षिण-पूर्व दिशेच्या कोपर्यात हिरवळ दर्शवणारे चित्र लावावे.
* घरातील नळ गळत नसावे.
* घरात गोल कोपरे असलेलं फर्नीचर शुभ आहे.
* घरात तुळशीचं झाडं पूर्व दिशेत गॅलरीत किंवा पूजा स्थळी ठेवावे.
* वास्तुप्रमाणे उत्तर किंवा पूर्व दिशा पाणी काढण्यासाठी योग्य मानली गेली आहे. ही दिशा आर्थिक दृष्ट्या शुभ मानली गेली आहे.
तर हे होते अगदी सोपे उपाय, आपण घरात किंवा जीवन शैलीत लहान से बदल करुन जीवनात सुख-समृद्धी सकारात्मकता आणू शकता...