Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2019 : मूलांक भविष्य, जाणून घ्या कसे राहील नवे वर्ष तुमच्यासाठी

Updated: बुधवार, 2 जानेवारी 2019 (12:30 IST)
मूलांक 4
वर्ष 2019 मूलांक 4 असणार्‍यांसाठी थोडे आव्हानात्मक राहील. या वर्षी चतुरतेपेक्षा कठोर परिश्रमाने कार्य करावे लागतील. सिव्हिल सेवा, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट आणि मेडिकल परीक्षेची तयार करत असल्यास शॉर्टकट रस्ता न घेता गहनपणे अभ्यास करा. कारण परिश्रम केल्याशिवाय यश मिळण्याची शक्यता कमी असते. या वर्षी आव्हानांसोबतच आनंद प्राप्ती होत राहील ज्यामुळे काही नवीन करत राहण्यासाठी प्रेरणा मिळेल. या वर्षी आपलं कौटुंबिक जीवन जरा प्रभावित राहू शकतं. तसेच लव लाइफमध्ये पार्टनरसोबत गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. म्हणून मॅरिड लाइफ आणि लव लाइफ यात धैर्य राखून पुढे वाढा. आपल्या जोडीदाराला दु:ख होईल असे वागू नका. वाद-ताणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कोणाच्याही वादात गुंडाळले तर जात नाहीये याची पुरेपूर काळजी घ्या. या वर्षी आपण आपल्या मित्र आणि नातेवाइकांसोबत चांगला वेळ घालवाल. वर्ष 2019 मध्ये आपल्याला हैराण करणार्‍या काही अनपेक्षित घटना घडू शकतात.
 
मूलांक 5
मूलांक 5 असणार्‍यांसाठी वर्ष 2019 उत्तम जाणार आहे. या वर्षी अनेक आव्हानां सामोरा जावं लागेल परंतू आपल्या बुद्धी आणि आत्मबळावर आपण सर्व समस्यांना मात कराल. आपण इंजिनियरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंट विषयाचा अभ्यास करत असला तर परिणाम सुखद मिळतील. परंतू उत्तम परिणाम मिळवण्यासाठी सतत मेहनत करण्याची गरज आहे. या वर्षी आपली वाणी आणि भाषा यामुळे अनेक आनंददायी संधी हाती लागू शकते कारण संवाद शैलीत सुधार झाल्याने अनेक लोकं आपल्याहून प्रभावित होतील आणि आपल्याला पुढे वाढण्याची संधी लाभेल. या वर्षी संबंध मजबूत होतील. दरम्यान जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. पर्यटनाचे योग आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष नवीन संधी घेऊन येईल. नोकरीत प्रमोशन आणि सॅलरी इंक्रीमेंटचा लाभ मिळेल. तसेच व्यवसायात मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता आहे.
 
मूलांक 6
मूलांक 6 असणार्‍यांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे म्हणून आव्हाने स्वीकारायला तयार राहा. आपल्या मजबूत आत्मविश्वास आणि सार्थक प्रयत्नांपुढे काहीही अशक्य नाही. नोकरीपेशा आणि व्यवसाय करणार्‍यांना अनेक आव्हानांना सामोरा जावं लागेल. परंतू धैर्य आणि आत्मविश्वास असल्यास सर्व समस्या दूर करता येऊ शकतात. सिव्हिल सेवा, मेडिकल, मॅनेजमेंट आणि इंजिनियरिंगाचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे. तसेच परिश्रमाचे फल उत्तम मिळेल. या वर्षी आपल्या व्यक्तित्वात आकर्षण राहील ज्यामुळे इतर लोकं आपल्याकडे आकर्षित होतील. या प्रभावामुळे लोकं आपल्या संपर्कात येतील आणि याचा मदतीने आपल्याला पुढे वाढण्यास मदत मिळेल. प्रेमी युगलासाठी हे वर्ष उत्तम राहील. या काळात आपण एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल आणि आनंद अनुभवाल. परंतू नात्यात गैरसमज होऊ नये याची काळजी घ्या आणि आपल्या पार्टनरकडे प्रामाणिक लक्ष द्या व त्यांच्या भावना समजून घ्या.
मूलांक 7
वर्ष 2019 मूलांक 7 असणार्‍या लोकांसाठी अत्यंत प्रगतिशील राहील. धर्म - अध्यात्माकडे कल वाढेल. या वर्षी सामाजिक जीवनात आपला प्रभाव वाढेल आणि लोकं आपल्या गोष्टींना महत्त्व देतील. आपण परोपकार करण्यात पुढे राहाल आणि दुसर्‍यांना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित कराल. नोकरी आणि व्यवसाय करणार्‍यांना आव्हानांना सामोरा जावं लागेल. परंतू र्धेर्य ठेवल्यास समस्या दूर होतील. कामात अधिक व्यस्त असल्यामुळे कुटुंबाला वेळ देणे कठिण जाईल. मनोविज्ञान सारख्या विषयांचा अभ्यास करत असणार्‍यांसाठी वर्ष उत्तम ठरेल. सिव्हिल सेवा आणि मेडिकल परीक्षेत मनोविज्ञानाशी संबंधित विषयांचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त भाषा विज्ञानाचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम प्राप्त होतील. या वर्षी कौटुंबिक जीवनात चढ- उतार बघायला मिळेल म्हणून धैर्यपूर्वक काम करावे. व्यवसायात असलेल्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे.
 
मूलांक 8
वर्ष 2019 मूलांक 8 असणार्‍यांसाठी सामान्य राहणार आहे परंतू या वर्षी आपल्यावर शनी दैवताची कृपा असेल. शनीच्या शुभ प्रभावामुळे या वर्षी आपल्या समस्या असल्या तरी यश मिळेल. आपण सिव्हिल सेवा, मेडिकल, इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट सारख्या परीक्षेची तयारी करत असाल तर चांगले परिणाम हाती लागतील. या वर्षी अधिक कामात गुंतलेला असल्यामुळे अस्वस्थता असू शकते परंतू अधिक ताण न घेता धीराने पुढे वाढावे. या वर्षी आपल्या निवास किंवा नोकरीमध्ये परिवर्तनाची शक्यता आढळत आहे. कामानिमित्ताने बाहेर गेल्यामुळे कुटुंब आणि प्रेम संबंध प्रभावित होऊ शकतात. यामुळे दुरी निर्माण होऊ शकते. कामाची अधिक व्यस्ततेमुळे आपल्या आरोग्यावर याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. म्हणून कामाव्यतिरिक्त खाजगी जीवनावर लक्ष देण्याची गरज आहे हे विसरून चालणार नाही. 
 
मूलांक 9
मूलांक 9 असणार्‍या लोकांसाठी 2019 अत्यंत प्रगतिशील राहील. या वर्षी आपण आपल्या ऊर्जा शक्तीने केवळ आपले स्वप्न पूर्ण करणार नाही तर दुसर्‍यांची मदत देखील कराल. आपण पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असल्यास आपल्या हुशारी आणि आर्थिक लाभ मिळवाल. नोकरीत असलेल्या लोकांना या वर्षी प्रमोशन आणि सॅलरी इंक्रीमेंटची संधी मिळू शकते. या व्यतिरिक्त आपण कार्यस्थळी पुढे वाढण्यासाठी सहकार्यांना मदत कराल. आपले मित्र आणि वरिष्ठ अधिकारी आपल्या या व्यवहाराची प्रशंसा करतील. या वर्षी आपण योजनेनुसार पुढे वाढाल आणि बुद्धिमत्तेने यश मिळवाल. आपल्यात प्रगती करून लक्ष्य प्राप्तीचे सामर्थ्य असेल. या वर्षी विभिन्न माध्यमांतून आपल्याला लाभ होईल. अशात व्यवसाय करत असणार्‍यांना आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकतं. वैवाहिक जीवन सुखमय राहील परंतू लव्ह लाइफमध्ये काही अडचणी येऊ शकतात म्हणून प्रेम-प्रसंगात जरा सांभाळून वागणे योग्य ठरेल. साथीदारावर उगाच संशय घेणे टाळा आणि त्यांच्या भावना समजून घ्याव्या. या वर्षी आपण निरोगी आणि फिट राहाल.

सर्व पहा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments