Festival Posters
✕

साप्ताहिक राशीफल 6 ते 12 जानेवारी 2019

Updated: शनिवार, 5 जानेवारी 2019 (16:27 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. प्रवासात विशेष दक्षता घेणे उचित ठरेल व होणारे नुकसान काही प्रमाणात टळू शकेल. कर्ज व्यवहारात विलंब व अडथळे जाणवतील. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल स्थितीच राहील व मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधकच ठरेल.
 
सिंह : या आठवड्यात उधारी वसुलीचे संकेत व सूचना प्राप्त होतील. आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे काही प्रमाणात दगदग व त्रास निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल.
 
कन्या : प्रगतीचा मार्ग खुलाच राहील. दीर्घ कालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडेल. मानसिक आनंद वाढीस लागेल. अंतिम चरणात आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होईल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. धनलाभ होऊ शकतो.
 
तूळ : सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे अपयशाचा सामना करावा लागणार नाही. क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व प्रस्थापित स्वरूपातच राहू शकेल व बक्षीसपात्र स्थिती कायम राहील. अंतिम चरणात नोकरीत बढतीचे योग जुळून येतील. अधिकारी वर्गाची मर्जी राहील व त्यांनी सोपविलेली कामगिरी आपल्या हातून पूर्ण होऊ शकेल. 
 
वृश्चिक : महत्त्वपूर्ण कामाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. अपेक्षित यश मिळू शकेल. अंतिम चरणात धार्मिक स्वरूपाच्या कार्यक्रमानिमित्त प्रवास योग जुळून येईल व प्रवास अनुकूलतेचा ठरेल. कोणत्याही बाबतीत सहसा अपयशाचा सामना करावा लागणार नाही व यश समोर दिसेल.
 
धनू : नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा स्वीकार जरूर जरूर करावा भावी काळासाठी तो लाभप्रद ठरू शकेल. अंतिम चरणात सर्वत्र अडथळेचा सामना करावा लागेल व जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच र्मयादित ठेवणे उचित स्वरूपाचेच ठरू शकेल.
 
मकर : सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहतील. विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास मिटण्याच्या मार्गावरच राहू शकेल. अंतिम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा असणारा लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात आपला दबदबा कायम राहील व जे कार्य इतरांना शक्य झाले नाही ते कार्य आपल्या हातून पूर्ण होऊ शकेल.
 
कुंभ : संततीबाबत आनंद वार्ता हाती येतील. हातात पैसा खेळता राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. अचानक धनलाभ संभवतो व इतरांकडून आर्थिक सहकार्य वेळेवर मिळून आर्थिक समस्या मिटतील. अंतिम चरणात दूर निवासी असणार्‍या प्रिय व्यक्तीचे अनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन मानसिक आनंद वाढून समाधान लाभेल.
 
मीन : हा आठवड्यात आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व कौटुंबिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येईल. शांतता टिकून राहील व सर्वत्र यश समोर दिसेल. अंतिम चरणात दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात उपयुक्त व भावी काळाच्या दृष्टीने लाभदायकतेचा कालखंड आहे. अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील व मनावरील काळजीचे दडपण मिटेल.

सर्व पहा

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Karwa Chauth 2026 करवा चौथ: अखंड सौभाग्याचा सण; जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व आणि पौराणिक कथा

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments