शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:04 IST)

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: कर्क

या वर्षी कर्क राशीच्या जातकांच्या आरोग्यात चढ- उतार बघायला मिळेल. यासाठी संतुलित दिनचर्या पाळली पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. असे केल्याने तुम्ही निरोगी राहाल. या वर्षी आपणास पित्तासंबंधित आजारांना सामोरा जावं लागू शकतं. उष्णता, ताप, विषमज्वर असे आजार होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून अखेर काही प्रमाणात आपले आरोग्यास सुधारणा होईल. पण आरोग्याच्या कुरबुरी चालूच असणार.
 
लहान-सहान आजारांकडे देखील दुर्लक्ष करू नका अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं. यासाठी आपणास आपली मानसिक क्षमता वाढवावी लागेल.
 
स्वतःची काळजी घ्या आणि मानसिक दुर्बलता येऊ देऊ नका. तणावाला कमी करण्यासाठी दररोज नियमित योगा- प्राणायाम करा. स्वतःच्या  जीवनशैलीत बदल करा. जुलैच्या सुरुवाती मध्ये आरोग्याबद्दल आपल्याला अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात आपणास शारीरिक व्याधी होण्याची शक्यता आहे. आपली मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे त्या मुळे आपणास मानसिक व शारीरिक अस्वस्थता जाणवेल. अती परिश्रम करणे टाळा.