रविवार, 12 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2019 (10:10 IST)

दुर्मिळ घटना : घोड्याच्या मुत्राशयावर कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

bladder-of-the-horse-had-cancerous-successful-surgery-at-bailgoda-hospital-in-parel
मुंबईतील परळ बैलघोडा या पशुवैद्यकीय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी घोड्याच्या मुत्राशयाच्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्याला जीवदान मिळाल आहे. घोड्यावर अशा पद्धतीने शस्त्रक्रिया करणं वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ मानली जात आहे. 
 
कल्याणच्या खडवलीतील शिवनिकेतन ट्रस्टच्या भारतीय सैनिकी विद्यालयातील घोड्याच्या अवघड ठिकाणी दिसणारी ती गाठ जखम असल्याचे प्रथम दर्शनी भासत होती. पण, त्या गाठीची तपासणी केल्यानंतर कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. या दरम्यान घोड्याच्या हालचालीत बदल आणि शिथिलता दिसून येत होती. मग  या घोड्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी तीन किलो वजनाची गाठ बाहेर काढण्यात आली. सध्या घोडा निरीक्षणाखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पाच तास चालली.