मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (15:41 IST)

मुंबईत सुटकेस मध्ये सापडले पुरुषाचे शवाचे तुकडे

मुंबई येथे माहीम येथील  मगदूम शहा बाबा दर्गाच्या पाठीमागे, समुद्र किनारी एका पुरुषाच्या शरीराचे तुकडे एका सुटकेसमध्ये सापडले आहेत. या गंभीर प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोणाची हत्या करून असे शरीराचे तुकडे केले गेले आणि समुद्रात फेकले याबाबत माहिती पोलिसांनी मिळू शकली नाही.  
 
माहीम येथील पश्चिम भागाकडील दर्ग्यामागील समुद्र किनारी एक पांढऱ्या काळ्या रंगाची अमेरिकन टुरिस्टर कंपनीची सुटकेस पाण्यावर तरंगताना दिसून आली होती. यामध्ये मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात व गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय पंज्यासह, काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत कापलेले पुरुषाचे गुप्तांग सापडले आहे. पोलिसांनी सापडलेले हे अवयव सायन हॉस्पिटलमध्ये पाठविले गेले आहे. या प्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल अज्ञात आरोपींविरोधात दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.