सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2019 (10:07 IST)

विकासकामांना स्थगिती नाही, कामे रद्द नाहीत : मुख्यमंत्री

राज्यातल्या कोणत्याही  विकासकामांना स्थगिती देण्यात आलेली नाही किंवा कोणतीही कामं रद्द करण्यात आलेली नाही. उलट ही कामं अधिक गतीने कशी होतील याकडे आम्ही लक्ष देत आहोत. यात देखील प्राधान्यक्रम ठरवून यापुढील वाटचाल होईल. राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी बैठकीद्वारे आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. 
 
पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकासकामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.