मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2019 (10:09 IST)

पीएमसी घोटाळा : बँकेच्या तीन संचालकांना अटक

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या तीन संचालकांना अटक केली आहे. संचालक जगदीश मुखे, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्या मुक्ती बावीसी आणि संचालक आणि रिकव्हरी समिती सदस्या  तृप्ती बने अशी त्यांची नावं आहेत. त्यांना मुंबई न्यायालायात हजर केले जाणार आहे. 
 
पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. याप्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आलेली आहे.