बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:43 IST)

Numerology Prediction 2020 मूलांक 9 साठी अंक ज्योतिष

मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे, म्हणून आपण उत्साही आणि जोखीम घेणारी व्यक्ती आहात. राहू आपल्यात अती ऊर्जा भरणार असून या वर्षी आपण अती आत्मविश्वासाच्या बळी पडू शकता. आपण या ऊर्जेमुळे चुकीचा पर्याय निवडू शकता.
 
ह्या वर्षी आपण आपण भूमी, भवनामध्ये गुंतवणूक कराल. हे आपणास फायदेशीर ठरणार आहे. वाद विवादाची परिस्थिती टाळा. स्वतःवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी वाद करणे टाळावे.
 
ह्या वर्षी आपल्यावर कौटुंबिक जबाबदारी येण्याची शक्यता आहे. आई वडिलांची सेवा करावी. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. आपला अधिकारी वर्ग आपल्याशी खूश राहील. आपण आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवाल. कुटुंबाच्या गरजेच्या वेळीस आपण मदत कराल. वैवाहिक जीवन संमिश्र असणार आहे. जोडीदारासोबत जुने वाद विसरून नावीन्याने वागा. ह्या संधीला लाभ घ्या.