रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:22 IST)

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: वृषभ

ह्या वर्षी वृषभ राशीच्या लोकांसमोर काही आर्थिक आव्हाने येण्याची दाट शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीस नफा तर होईल पण नुकसान होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. पैशांचे नियोजन काळजीपूर्वक करा. सासरच्या मंडळी कडून आर्थिक पाठबळ असेल. 
 
आपण्यास गरजेच्या वेळीस ते हात-भार लावतील. ह्या वर्षाची सुरुवातीचा काळ आणि सप्टेंबर ते डिसेंबर ह्या कालावधीत आर्थिक नियोजन विचारपूर्वक करा. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असा काहीसा हा काळ असेल. तसे आपण विचारपूर्वकच गुंतवणूक करता पण ह्या काळात घरात कोणते न कोणते शुभ कार्य होतील त्या साठी खर्च करावा लागणार. 
 
घरात डागडुजी, घराचे नूतनीकरण इत्यादीं मध्ये अधिक पैशा लागेल. वर्षाच्या अखेरीस आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन नीट करा.
 
एप्रिल, जून आणि सप्टेंबरच्या पूर्वार्धात आर्थिक लाभ मिळतील. त्यासाठी योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी निधी जमा करू शकता. वर्षाच्या मध्यकाळ खर्चिक असेल. तुमचे बजेट बिघडेल. त्याचा सखोल विचार केल्यास आपण ह्या स्थितीतून बाहेर पडाल.
  
फेब्रुवारी आणि मे महिना विशेष फायदेशीर ठरेल. वर्षाच्या सुरुवातीस कोणती ही मोठी गुंतवणूक करू नका. नवे व्यवसायाचा विचार करू नका. त्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या वर्षी हा विचार टाळा. लग्न समारंभात खर्च होतील. एखादी संपत्ती, नवे घर, दागिने, वाहन खरेदी कराल.
 
सप्टेंबर नंतर नफा होण्याची शक्यता आहे. आपण आपली जुनी देणी द्याल. व्यवसायात किंवा शेअर बाजारात लाभ होऊ शकतो. मार्चनंतरच्या काळात आपले उत्पन्न वाढविण्याकडे जातीने लक्ष द्याल. आपल्याकडे चांगली संपत्ती राहील त्याबरोबरच आपले खर्च ही वाढतील. खर्चांवर आळा घाला नाहीतर आपणास आर्थिक आव्हानांना समोरा जावं लागू शकतं.