बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (12:28 IST)

Astrology 2020 हे ज्योतिषी उपाय अमलात आणा, वर्ष सुखात घालवा

राशीनुसार वर्ष 2020 मध्ये करण्यासाठी ज्योतिषी उपाय 

मेष 
ह्या वर्षी दर शनिवारी नियमाने सावली दान करा. असे केल्यास मेष राशी च्या लोकांना हे फायदेशीर ठरेल. मोहरीचे तेल मातीच्या किंवा लोखंडी पात्रात भरून त्यात आपले मुखदर्शन करून ते एखाद्या देवळात दान करावे. मंगळाचे शुभ परिणामासाठी आणि त्वचा आणि यकृत संबंधी आजार टाळण्यासाठी आपण अनंतमूळ रत्न देखील घालू शकता.
 
 
वृषभ
ह्या वर्षी दर शुक्रवारी 11 वर्षाहून लहान मुलींना पांढरी मिठाई, तांदळाची खीर, खडीसाखर, बत्ताशे खायला द्या. मनोभावे त्यांचा आशीर्वाद घ्या. गायीला कणकेचे पेढे अर्पण करा. अनंतमूळ रत्न धारण करणे देखील फायद्याचं ठरेल. ज्याने आपल्याला बुधाचे दोष दूर करण्यास लाभ होईल. याशिवाय अल्सर, अपच, आणि रक्तासंबंधी विकार दूर करण्यास मदत मिळेल.     .
 
 
मिथुन
ह्या वर्षी आपण कुठल्याही देवळाच्या पायर्‍या स्वच्छ करण्याचे काम करावे. दर गुरुवारी आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. शक्य असल्यास पिंपळाचे झाड लावा. .आपण बुधाच्या दोषांमुळे होणारे विकार अल्सर, अपच, आणि रक्तविकार टाळण्यासाठी गुग्गुळी (समुद्रशोक) धारण करू शकता. 
 
कर्क 
हे संपूर्ण वर्ष आपण सावली दान करावी. ह्या साठी आपण माती किंवा लोखंडी पात्रात मोहरी तेल भरून त्यात आपले मुखदर्शन करून ते तेल दान करावे. दर मंगळवार आणि शनिवार चमेली तेलाचा दिवा लावावा. हनुमान चालीसा, बजरंगबाण, किंवा सुंदरकांडचे वाचन करावे. लहान मुलांना वाटाणे आणि गुळाचा प्रसाद द्यावा. उत्तम मानसिक संतुलन, निर्णय घेण्याची उत्तम क्षमता, सकारात्मक विचार आणि चंद्र बिघडल्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी चंद्र यंत्राची स्थापना करावी.
 
सिंह 
दररोज सूर्योदयापूर्वी उठून उगत असलेल्या सूर्याचे दर्शन घ्यावे. अंघोळ झाल्यावर एका तांब्याच्या पात्रात लाल फुल आणि कुंकू घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. आदित्य नवग्रह स्रोताचे नियमित पठण करावे. घरात किंवा कार्यालयात सूर्य यंत्र स्थापित करावे. करिअरमध्ये चांगले परिणाम दिसून येतील तसेच समाजात मान वाढेल. नकारात्मक प्रभाव नाहीसे होतील.
 
कन्या
महाराज दशरथकृत नीलशनी स्रोताचे, श्री विष्णू सहस्रनाम स्रोताचे नियमित पठण करणे. गायीला चारा खाऊ घालणे हे आपल्यासाठी उत्तम ठरेल. बुधवारी 1 ते 11 वयोगटाच्या मुलींना आणि सवाष्णींनीना हिरवे वस्त्र, बांगड्या अर्पण कराव्या. बुधाचे दोष दूर करण्यासाठी अल्सर, अपचन आणि रक्ताशी संबंधित विकार टाळण्यासाठी आपण गुग्गुळी (समुद्रशोक )धारण करू शकता.
 
तूळ
गोर गरिबांना जास्तीत जास्त मदत करा. दर शनिवारी देवळात जाऊन काळे वाटाणे वाटावे. सहकाऱ्यांशी सलोख्याने वागा. मुंग्यांना गव्हाचे पीठ घाला. हिरा किंवा ओपल रत्न धारण करावा. आई आणि गायीची सेवा करावी. लहान मुलींचे आशीर्वाद घ्या.
 
वृश्चिक
आपण नियमाने शुद्ध तुपाचा दिवा लावून श्रीहरी विष्णूंची आराधना करावी. यथाशक्ती ब्राह्मण आणि भुकेल्यांना भोजन द्यावे. गुरुवारी पुष्कराजरत्न (पुखराज रत्न) सोन्याच्या अंगठीत पहिल्या बोटात धारण करावे. आपण मोती देखील घालू शकता. दररोज सूर्याला अर्घ्य द्या. कुत्र्याला भाकर घाला.
 
धनू
ह्या वर्षी आपण दर शनिवारी सावली दान करावी. ह्या साठी आपण माती किंवा लोखंडी पात्रात मोहरी तेल भरून त्यात आपले मुखदर्शन करावे नंतर ह्या तेलाला दान करावे. दररोज देवळाच्या पायर्‍या स्वच्छ करण्याचे काम करा. 
 
मुंग्या आणि मासे यांना काही तरी खायला द्या. महाराज दशरथकृत नीलशनी स्रोताचे पठण करावे. तांब्याच्या पात्रात कुंकू घालून सूर्याला अर्घ्य द्या. घरात शनी यंत्राची स्थापना करावी.
 
मकर
ह्या वर्षी आपण नियमाने शनिदेवाची उपासना करावी. पिंपळाला दर गुरुवारी आणि शनिवारी पाणी घालावे. गोर गरिबांची मदत करावी. मुंग्यांना गव्हाचे पीठ घालावे. धार्मिक कार्य करावे. आळस त्याग करावा. नीलम रत्न मधल्या बोटात धारण करावे.
 
दर गुरुवारी विष्णूंना पिवळे फुल अर्पण करावे. श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करून गणपतीस दूर्वा अर्पण कराव्यात. मानसिक आजार, संधिवात, आणि शनिदोषाचे दुष्प्रभाव कमी करण्यासाठी धोत्र्याची जड धारण करावी. 
 
कुंभ 
ह्या वर्षी श्रीयंत्र स्थापित करून नियमाने पूजा करावी. देवी महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचे जप करावे. गायीला कणकेचे पेढे खायला घालावे. गोठात गोदान करावे. महिलांना आदर द्यावा. मुंग्यांना गव्हाचे पीठ घालावे. सहकारी आणि गरिबांशी आदराने व्यवहार करावा. गरजूंना शक्य तेवढी मदत करा.
 
मीन
ह्या वर्षी पिंपळ आणि केळीची झाडे लावा. दर गुरुवारी पिंपळाला स्पर्श न करता पाणी घालावे. शक्य असल्यास दर गुरुवारी उपास करावा. उपवासात केळे घेणे टाळावे.
 
दररोज कपाळी केशराचा टिळक लावावा. यथायोग्य ब्राह्मणांना अन्न आणि दक्षिणा द्यावी. कोणालाही खोटी आश्वासने देऊ नये. तपकिरी रंगाच्या गायीला गूळ आणि पीठ द्यावे. कुठल्याही धार्मिक स्थळी सेवा आणि दान करा.
 
ज्ञान, संपत्ती, समृद्धी मिळवण्यासाठी आणि बृहस्पती ग्रहाचे दोष निवारण करण्यासाठी घरात गुरूच्या यंत्राची स्थापना करावी.