सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:13 IST)

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: कन्या

आरोग्याच्या बाबतीत कन्या राशीच्या जातकांना काळजी करण्यासारखे काही नाही. हे वर्ष भाग्य घेऊनच आला आहे असे म्हणता येईल.
 
हे वर्ष आपणास उत्तम आरोग्याची प्राप्ती करणारा आहे. आपण सर्व कामे अती उत्साहाने कराल. सर्व कार्यात आपण उत्कृष्ट कामगिरी कराल. मग ते वैयक्तिक क्षेत्र असो वा व्यावसायिक. आपण आपल्यातील उत्साहाचा अनुभव 
 
घेऊ शकाल. आपली जीवनशैली सुधारेल. त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होईल.   
 
अती कामाचे ओझे घेऊन दमू नका. तसं तर हे वर्ष आरोग्यादृष्ट्या अगदी उत्तम ठरणार तरी किरकोळ समस्यांकडे देखील दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर त्यांचे औषधोपचार करा. मज्जासंस्था आणि पचन संबंधित समस्या काही 
 
प्रमाणात आपणास त्रास देऊ शकतात. आपण मानसिकदृष्ट्या दृढ राहाल. 
 
योगा आणि ध्यान हे आपल्याला ताजे तवाने ठेवण्यास मदत करेल.