शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: रविवार, 31 मे 2020 (14:45 IST)

साप्ताहिक राशीफल 31 मे ते 6 जून 2020

मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होण्याच्या मार्गावर येईल. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहून अपयशाचा सामना करावा लागणार नाही. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होऊ शकेल. अंतिम चरणात आर्थिक स्थिती अस्थिर होण्याची दाट शक्यता आहे. जवळ आलेले यश दूर जाऊन विविध अडचणी व समस्या समोर दिसू लागतील.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे अहितकारकच ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे आवश्यक ठरू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी राहील. दगदग व त्रास सहन करावा लागला तरी अंतिम यश मिळण्याची शक्यता आहे. अपेक्षित यश समोर दिसेल.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. सर्वत्र नेत्रदीपक यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढविणे गरजेचे ठरेल. तरच यशाचा मार्ग खुला होण्याची दाट शक्यता आहे. इतरांवर अधिक विसंबून राहणे अहितकारक ठरू शकेल.
 
कर्क :  सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील करार व्यवहार लाभप्रद ठरतील व व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नोकरीत अधिकार वाढीचे योग जुळून येतील व अपेक्षेप्रमाणे सर्व सुरळीतपणाने होतील. अंतिम चरणात सर्व बाजूंनी सहकार्य मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढविणारी कामगिरी घडेल. आर्थिक लाभाच्या घटना व घडामोडी घडून येण्याची दाट शक्यता आहे.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात जवळचा प्रवास योग घडेल. प्रवास कार्यसाधक ठरू शकेल. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. मनोनुकूलरीत्या यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. यशाचा मार्ग खुलाच राहून यश मिळू शकेल. अंतिम चरणात नोकरीत अधिकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती सुरळीतपणाच्या मार्गावर राहील. काही बाबतीत दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढेल.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक ठरू शकेल. शांतता ठेवणेच आवश्यक व हितावह ठरेल. अंतिम चरणात धार्मिक स्वरूपाचा प्रवास योग आहे. कार्यक्षेत्रात जे कार्य इतरांना शक्य झाले नाही ते कार्य आपल्या हातून पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. मानसिक सुख-शांती व समाधान मिळून उत्साह वाढेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा असणारा लाभ मिळेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास तो जरूर जरूर स्वीकारावा. भावी काळात तो फायदेशीरच ठरू शकेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. सावधानता ठेवूनच वाटचाल करणे योग्य ठरेल. भावी काळात होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल व शांतता टिकून राहू शकेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य व्यवस्थितरीत्या कार्यरत राहील. आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहतील. इतरांकडून आवश्यक असणारे सहकार्य वेळेवर मिळेल. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होऊ शकतील. अंतिम चरणात भागीदारीमधून विशेष स्वरूपाचा धनलाभ मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. भागीदारीमधील असणारे सर्व वादविवाद मिटतील. भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहून यश मिळेल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. हातात पैसा खेळता राहील. इतरांकडून येणारा पैसा वेळेवर हाती येण्याचे संकेत मिळतील व यश दृष्टिक्षेपात राहील. अंतिम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. आपले सहकार्य इतरांना विशेष प्रकारे करून उपयोगीतेचे सिद्ध होईल. मानसिक शांतता प्रस्तापित राहून काळजीचे दडपण दूर होईल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. मानसिक शांतता व समाधान लाभेल. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे मदतीचा हात इतरांकडून पुढे येईल व समाधान लाभेल. अंतिम चरणात स्पर्धा परीक्षेमधील निकाल समाधानकारक लागेल. दूर निवासी प्रियव्यक्तीचे मनोनुकूलरीत्या दूरध्वनी येतील. मानसिक आनंद वाढेल. मनावर असलेले दडपण दूर होऊ शकेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. सहकारी वर्ग अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतील. अंतिम चरणात अचानक धनलाभ योग संभवतो. जुने येणे वसुलीच्या मार्गावर राहतील. इतरांनी आर्थिक सहकार्याचे दिलेले आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहू शकतील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक चढ-उतार निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच र्मयादित ठेवणे उचित ठरेल. होणारा मनस्ताप टळेल. सुख-शांती कायम राहू शकेल. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी बक्षीसपात्र स्थितीतच राहील. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. जवळचा प्रवासयोग जुळून येऊ शकेल.