1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (17:58 IST)

साप्ताहिक राशीफल 22 ते 28 नोव्हेंबर 2020

मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत मनाविरुद्ध खर्च करावा लागेल व कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. काळजीचे सावट वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. मानसिक शांतता काही प्रमाणात टिकून राहील. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधक ठरेल व यश मिळेल.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती कायम राहील. महत्त्वपूर्ण प्रवास कार्यसाधक ठरू शकेल व यश समोर दिसेल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल. आर्थिक अस्थिरता वाढण्याची चिन्हे दिसतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज व आढावा घेणे उचित ठरेल. होणारे नुकसान टळू शकेल.
  
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक लाभ होऊन हातात पैसा खेळता राहील. आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात नियोजित खर्चापेक्षा अधिक प्रमाणात खर्च करावा लागेल. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. आर्थिक व्यवहार पूर्ण करताना विशेष सावधगिरी ठेवणे आवश्यक व उचित ठरेल. होणारे नुकसान टळेल.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील बहुतेक समस्या व प्रश्न मनोनुकलरीत्या मिटतील. व्यवसाय क्षेत्र आघाडीवर राहील. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात कायम ठेवणारी ग्रहस्थिती आहे. काळजीचे सावट काही प्रमाणात मिटेल. अंतिम चरणात लाभाचे प्रमाण समाधानकारक स्थितीत राहील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे दडपण कमी होईल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडून येईल. सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल. स्थगित व्यवहार सुरळीतपणाने गतिमान होतील. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येईल. उद्योग क्षेत्रातील पुढचे पाऊल पुढेच राहील. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढेल.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरू शकेल. शांतता ठेवणेच उचित स्वरूपाचे राहून होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात चांगल्या कामासाठी प्रवास करावा लागेल व प्रवास कार्यसाधक ठरेल. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडेल व अपेक्षितरीत्या असणारे यश दृष्टिक्षेपात राहू शकेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव इतरांकडून समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा. भावी काळासाठी लाभदायक व उचितपणाचे ठरेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणी वाढविणारी ग्रहस्थिती आहे. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारकच ठरण्याची शक्यता आहे.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या बहुतेक सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहील. विरोधक आपला कार्यक्रम स्थगित करण्याचा प्रयत्न जारी करतील व अपेक्षित यश समोर दिसेल. अंतिम चरणात इतरांकडून येणारा भागीदारीचा प्रस्ताव भावी काळाच्या दृष्टीने लाभदायक स्वरूपाचाच सिद्ध होईल. सहकारी वर्गाचे सहकार्य वेळेवर मिळून अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतील.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्व प्रकाराच्या परीक्षेमध्ये मनोनुकूल स्वरूपाचे यश मिळेल. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. सर्वत्र नेत्रदीपक यशाचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल. अंतिम चरणात निरागस आरोग्याचा लाभ मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. विरोधक मंडळीची पिछेहाट होईल व विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा घेऊन वाटचाल करू लागतील.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कौटुंबिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. अल्पशा प्रयत्नाने सहजरीत्या केलेले प्रयत्न यश मिळवून देण्यास सर्मथ ठरतील. अंतिम चरणात स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हातात येण्याचे संकेत मिळतील. मनोनुकूल स्वरूपाचे यश दृष्टिक्षेपातच राहू शकेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहतील. कोणतेही काम सहसा अपूर्ण वा स्थगित राहणार नाही. क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहून यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात संततीबाबत सुखद वार्ता हाती येतील व संततीबाबत असणारी चिंता मिटेल. कार्यक्षेत्रात आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. यशाची खात्री राहील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक बाजू कमजोर राहून आर्थिक अस्थिरता जागवेल. इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील व आर्थिक टंचाईचा काही प्रमाणात सामना करावा लागेल. अंतिम चरणात कार्यक्षेत्रात जे कार्य इतरांना शक्य झाले नाही ते कार्य आपल्या हातून पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. सर्वत्र संघर्ष करावा लागला तरी अंतिम यश मिळून मनावरील काळजीचे सावट मिटेल.