रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. बाबा आमटे
Written By वेबदुनिया|

युवकांनो, संवेदनशीलतेचे शर हवेत- बाबा

युवकांकडून बाबा आमटेंना नेहमीच आपेक्षा होत्या. युवकच भारताला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, याची त्यांना खात्री होती. म्हणूनच युक्रांद या युवक क्रांती दलाच्या स्थापनेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यातही त्यांचा आशावाद दिसून येतो.

''एका कालखंडात युवकांच्या संस्थानी रंगवलेली स्वप्ने मला ठाउक होती. मी त्यांचा साक्षीदार आहे. वयाच्या 88व्या वर्षी तरुणाईच्या स्वप्नांची दीपमाळ विझलेली मी पाहतो आहे. अशा परिस्थितीत युक्रांद नवे स्वप्न पाहत, नव्या स्वरुपात उभे राहत आहे. माझी खात्री आहे की, नव्या स्वरुपात येणार्‍या युक्रांदचे भारतीय समाज कृपाळु स्वागत केल्याशिवाय राहणार नाही.युक्रांदच्या पराक्रमी पण सुकुमार आठवणींचे सुखद स्मरण करुन मी युक्रांदच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो, आशिर्वाद देतो.

आपण सर्वजण जाणतो की कोणतेही राष्ट्र तरूणाईच्या भक्कम खांद्यावरच उभे असते. एकविसावे शतक उजाडल्याबरोबर क्षितिजावर धुराचे लोट दिसू लागले आहेत. सारे राजकीय विचा रवंत सांगत ाहेत की हजारो वर्षांच्या परिश्रमाने निर्माण झालेली मानवी संस्कृती संकटात आहे. नव्हे ती तुटण्य ाच्या उंबरठ्यावर उभी आहे. पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व टिकविण्यासाठी अजून बापूजींचा क्षीण आक्रोश ऐकू य ेतोय. बापूजींचा तो आवाज युक्रांद ऐकू शकेल का?

पुन्हा अंकुरण्यासाटी न शरमणारे युक्रांदचे बीज आहे. बीज मूकपणे एक वचन देते, ते म्हणते, अनुरूप परिस्थिती लाभली की अंकुरण्याची मी लाज बाळगणार नाही. संघटना पुन्हा सुरू होत असताना तिची दिशा निश्चित असावी. मोठ्या आकाराच्या मोहापायी युक्रांदने दिशा गमावू नये. शिकार कशाची करायची हे निश्चित आहे. निबिड जंगलात धावायचे आहे. पण दिशा ठरलेली आहे. शिकारीचे धैर्य आहे. हातात गांडीव आहे. पाठीवर भाता आहे. पण त्या भात्यात संवेदनांचे शर भरपूर असावेत. संवेदनांचे शर नसतील, तर शिकार कशी करणार?

संवेदनांचे शर हरवून बसलेल्या तरूणाईचा आजचा हा समाज आहे. त्यात युक्रांदला काम करायचे आहे. राजकाराण की विधायक काम हे द्वंद्व सामोर येईल. तो आभास आहे. चकवा आहे. विधायक वृत्तीशिवाय राजकारण वांझोटे आहे. अन राजकारणाशिवाय विधायक कार्य नपुंसक आहे. राजकीय भूमिका असावी, पण राजकारणी डावपेची बनू यने. प्रत्यक्ष कृतीशिवाय तत्वांना, विचारांना किंमत नसते. आचरणाशिवाय वाणी पोकळ ठरते. शरणागतीत कसलेही भविष्य नसते. भविष्याची आशा दडलेली असते ती कृतीमध्ये युवकांनो जुन्या पिढीच्या दोषांची रंगीत तालिम पुन्हा करू नका.

(युक्रांदच्या संकेतस्थळावरून साभार)