सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Amla Hair Mask दाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क

amla hair pack
केस इतके गळत असतील की केसांमध्ये कंगवा टाकायलादेखील भीती वाटतं असेल तर आम्ही आपली ही भीती दूर करू शकतो. केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याने तयार केलेले हेअर मास्क योग्य ठरेल. आवळ्याला इंडियन गूस्बेरी म्हटले जातं. आवळा केस गळणे थांबवतं आणि केसांना दाट करण्यात मदत करतं. कोणत्याही भाजीपाले आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात अधिक मात्रेत व्हिटॅमिन आढळतं. ज्याने केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं. आवळ्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, म्हणून हे लावल्याने केसांना खूप फायदा होतो. आवळ्याचा रस केसांचा मुळात लावल्याने डेंड्रफची समस्या दूर होते. याने नवीन केसही उगवतात. 
 
आपल्याला जलद परिणाम हवे असल्यास रोज एक उकळलेला आवळा खायला हवा. याव्यतिरिक्त आपण घरी हेअर मास्क तयार करू शकता. 
 
केसांसाठी तेल
एक कप नारळ तेल गरम करून त्यात 4-5 आवळे आणि 5 ते 6 जास्वंदीचे पान टाका. 20 मिनिट उकळी घ्या नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी तसेच राहू द्या. गार झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. दर दोन दिवसाने याने मालीश करा.
 
हेअर मास्क 
1 चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी याची पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये 1 चमचा आवळा पावडर आणि 1 चमचा दही मिसळा. ही पेस्ट केसांना लावून एक तासासाठी तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुऊन टाका.
 
शाईनी केसांसाठी
एक चमचा ऍपल साइडर व्हिनेगर मध्ये 10 थेंब आवळ्याचे तेल मिसळा आणि यात एक चमचा मध आणि एक चमचा पाणी मिसला. आता ये मिश्रणाने शांपूनंतर पाच मिनिटापर्यंत आपल्या डोक्याचा मालीश करा आणि मग गार पाण्याने केस धुऊन घ्या.
 
पांढर्‍या केसांसाठी हेअर मास्क
एक कप जैतूनच्या तेलात एक चमचा आवळा पावडर आणि मूठभर कढीपत्ता मिसला. 15 मिनिट उकळा आणि गार होण्यासाठी राहू द्या. आठवड्यातून दोनदा रात्री हे तेल लावून सकाळी केस धुऊन टाका.
 
केसांसाठी कंडिशनर
1 अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात आवळा पावडर आणि एक चमचा मध मिसळा. मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. केस ओले करून हे मास्क केसांमध्ये लावा. केस वाळवून शांपूने धुऊन टाका.
 
दोन तोंडी केसांसाठी हेअर मास्क
एक चमचा मेंदी पावडरमध्ये एक चमचा आवळा पावडर मिसळा. आता यात दही टाकून पेस्ट तयार करा. पूर्ण केसांवर लावून एका तासासाठी तसेच राहू द्या. वाळल्यावर शांपूने केस धुऊन टाका.