गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (19:37 IST)

पांढरे आणि चमकणारे दातांसाठी हे उपाय अवलंबवा, पिवळेपणा नाहीसा होईल

अनेकांना चहा-कॉफी पिण्याची सवय असते. त्यामुळे दात पिवळे पडतात. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेतली नाही तर ते खूप खराब होतात आणि घाणेरडे दिसू लागतात. दातांवर पिवळे डाग पडल्याने लाज वाटते. या पिवळेपणाची अनेक कारणे असू शकतात. नीट ब्रश न करणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत अनेकांना दात स्वच्छ करण्याचा पर्याय निवडावा लागतो. पण आज आम्ही सांगत आहोत की दात पांढरे आणि चमकदार बनवण्यासाठी या काही हॅक्सचा अवलंब करू शकता.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 संत्री - हिवाळ्यात संत्री भरपूर प्रमाणात मिळतात. अशा परिस्थितीत त्याच्या सालीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन-सीमुळे दात पांढरे होण्यास मदत होते. हे प्लाक निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून टाकण्यास देखील मदत करते. यासाठी रोज रात्री संत्र्याची साल दातांवर चोळा. त्यामुळे तोंड स्वच्छ होण्यास मदत होते. आपण हे दररोज ब्रश करताना देखील  अनुसरण करू शकता. 
2 कोमट पाणी वापरा - बर्‍याच तज्ञांच्या मते, चहा किंवा कॉफी पिल्यानंतर योग्य प्रकारे ब्रश आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे, असं केल्याने ही समस्या टाळू शकता. अन्न खाल्ल्यानंतर किंवा चहा-कॉफी प्यायल्यानंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.
3 सफरचंद खा- दातांचे डाग दूर करण्यासोबतच दातांच्या इतर समस्या दूर करण्यात सफरचंद  मदत करत. हे  आपले दात पांढरे आणि चमकदार बनवू शकतात. सफरचंदांमध्ये मॅलिक अॅसिड असते, जे एक नैसर्गिक व्हाईटनिंग एजंट आहे. ज्याचा वापर टूथपेस्टमध्ये होतो. यासाठी रोज एक सफरचंद खा. हे दात एक्सोफोलिएट करण्यात देखील मदत करते. हे डाग तसेच बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते.