सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 8 एप्रिल 2024 (10:00 IST)

Beauty CareTips: सुरुकुत्या कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

face Wrinkle
वाढत्या वयासोबत त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात या सुरुकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी महिला नेहमी महागडे ट्रीटमेंट घेतात. पण खूप वेळेस या ट्रीटमेंटचे साइड इफेक्ट्स देखील होतात. सुरकुत्यांना कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा. घरगुती उपाय केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. तसेच सुरकुत्यांची समस्या ही दूर होते. 
 
एलोवेरा किंवा कोरफड जेल पण त्वचेसाठी लाभदायक मानले जाते या मध्ये  विटामिन सी, विटामिन ई सोबतच इतर पोषक घटक असतात. जे तुमच्या त्वचेला निरोगी  ठेवण्यासाठी सहायक असतात. एलोवेराला त्वचेवर लावल्याने  त्वचेतील ओलावा टिकून राहतो. सुरकुत्या कमी होण्यासाठी दररोज एलोवेरा जेलने चेहऱ्यावर मसाज करू शकता. 
 
ऑलिव्ह आईल हे अँटीऑक्सीडेंट गुणांनी भरपूर असते. या तेलाचा वापर केल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या कमी होतात. सुरकुत्यांपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर ऑलिव्ह आईलने मसाज करा. काही वेळानंतर चेहरा धुवून टाका.  
 
दहीमध्ये लैक्टिक एसिड असते जे त्वचेला एक्सफोलिएट करायला मदतगार असते. यासाठी तुम्ही दह्याने चेहऱ्यावर मसाज करा व थोडया वेळाने चेहरा पाण्याने धुवून टाका. 
 
नारळाच्या तेलात  फॅटी एसिड भरपूर मात्रामध्ये असते. जे तुमच्या त्वचेला पोषक तत्व देण्यास सहायक असते. तुम्ही झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर नारळाच्या तेलाने मसाज करा हे सुरकुत्या कमी होण्यास मदत करते . 
 
मध अँटीऑक्सीडेंट गुणांनी परिपूर्ण असते सोबतच हे त्वचेसाठी उपयोगी असते. सुरकुत्यांपासून मुक्तता हवी असल्यास तर चेहऱ्यावर मध लावून मसाज करा नंतर  हे चेहऱ्यावर 20-30 मिनिट तसेच राहू द्या व नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.