शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

पाण्याची कमी नाही तर, 5 पोषकतत्वांचा अभाव असल्यास फाटतात ओठ

Dry Lips Reason
उन्हाळयात ओठ फाटण्याची समस्या निर्माण होते. ओठ फाटणे ही एक सामान्य समस्या आहे. नेहमी आपण ओठ फाटण्याचे कारण पाण्याची कमी आहे असे समजतो. तसेच भरपूर प्रमाणामध्ये पाणी सेवन केल्यानंतर देखील ओठ कोरडे पडतात आणि त्यांची जळजळ होते. फक्त पाण्याची कमी नाही तर इतर पोषकतत्वांची कमी असल्यास ओठ फाटतात. तर चला जाणून घेऊ या कोणते आहे ते पोषकतत्व 
 
1. व्हिटॅमिन B ची कमी 
व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्समध्ये अनेक व्हिटॅमिन असतात. ज्यामध्ये काही ओठांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. व्हिटॅमिन B ची कमीमुळे ओठांची त्वचा कोरडी होऊन फाटू शकते. तसेच व्हिटॅमिन B3 च्या कमीमुळे ओठ फाटू शकतात. 
 
2. आयरनची कमी  
आयरन शरीरामध्ये ऑक्सीजनच्या परिवहनासाठी आवश्यक आहे. आयरनच्या कमी मुळे ऑक्सिजनची कमी होऊ शकते. ज्यामुळे ओठांची त्वचा ही कोरडी होऊन फाटू शकते. 
 
3. जिंकची कमी 
जिंक रोगप्रतिकात्मक शक्तीला मजबूत करण्यासाठी आणि त्वचेचे आरोग्य वाढवण्यासाठी आवश्यक आहे. जिंकची कमी ओठांची त्वचा अशक्त करू शकते. ज्यामुळे ओठ फाटतात . 
 
4. व्हिटॅमिन A ची कमी 
व्हिटॅमिन A त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन A च्या कमी मुळे ओठांची त्वचा कोरडी होऊन फाटू शकते. व्हिटॅमिन A शरीरात ओलावा टिकवून ठेवण्याचे महत्वपूर्ण तत्व आहे. 
 
5. ओमेगा-3 फॅटी एसिडची कमी 
ओमेगा-3 फॅटी एसिड आरोग्यदायी त्वचेसाठी आवश्यक आहे. ओमेगा-3 फॅटी एसिडची कमीमुळे त्वचा फाटू शकते. सोबतच याच्या कमी मुळे त्वचा सेल्स खराब होतात. 
 
6. पाण्याची कमी 
हे खरे आहे की ,पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ फाटतात. जेव्हा शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसते तेव्हा ओठांची त्वचा ही कोरडी होते. याकरिता योग्य प्रमाणात पाणी पिल्याने ओठांना ओलावा राहतो. ज्यामुळे ओठ फाटत नाही. 
 
इतर कारण
*हवा आणि उन्हाच्या संपर्कामध्ये येणे. 
*थंडे वातावरण 
*काही औषधे 
*एलर्जी
*त्वचा संबंधी आजार 
या समस्या निर्मण होऊ नये, म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिणे, पोषकतत्वांनी भरपूर आहार घ्यावा, हवा आणि उन्हाच्या संपर्कात येऊ नये, लिपबामचा उपयोग करावा, प्रदूषण आणि धूळ यांपासून स्वतःचे रक्षण करावे, त्वचा संबंधी आजरांवर उपचार करावा.   
 
ओठ फाटणे फक्त पाणी कमी असल्याचे संकेत नसतात तर काही इतर पोषकतत्व कमी असल्या कारणाने देखील ओठ फाटतात. ओठ फाटू नये म्हणून योग्य प्रमाणात पाणी सेवन करावे, पोषकतत्वांनी भरपूर आहार घ्यावा,   हवा आणि उन्हाच्या संपर्कात येऊ नये. जर वारंवार तुमचे ओठ फाटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर  आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी 
देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik