Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीत खुलवा सौंदर्य

Updated: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (11:49 IST)

* बेसन, हळद, गुलाबाचे पाणी व दुधावरची साय यांच्या लेपाने धुळ व माती तसेच चेहर्‍यावरील मृत त्वचा काढून टाका.
* नंतर कोणत्याही कोल्डक्रिमने चेहर्‍यावर तसेच मानेवर मॉलिश करून 5 मिनिटे वाफ घ्या.
* 2 चमचे मुलतानी माती, 1 चमचा मध, 2 चमचे गुलाबाचे पाणी, 1 चमचा चंदन पावडर यांचे दह्यात मिळवून लेप बनवून घ्या. हा लेप चेहरा, गळा व मानेला लावून घ्या. सुकल्यावर चेहरा धुऊन घ्या. चेहरा उठून दिसेल.
* यानंतर हाथ व पायांची काळजी घ्या. कोमट पाण्यात एक चमचा शॅम्पू, 3 ते 4 थेंब लिंबू व चिमूटभर मीठ टाकून या पाण्यात हात व पाय 10-15 मिनिटे बुडवून ठेवा. नंतर ब्रशच्या साह्याने मृत त्वचा काढून टाका. हाथ व पाय साध्या पाण्याने धुऊन मॉयश्चराइजर लावा. तुमचे हात व पाय सुंदर व कोमल दिसू लागतील.
* यानंतर तुमची वेशभुषा ठरवून घ्या. दिवाळीसारख्या शुभप्रसंगी घागरा, राजस्थानी ड्रेस, गुजराती साडी किंवा यासारखा तुम्हाला आवडणारे विशेष ड्रेस परिधान केले तर तुमचे रूप अजूनच खुलून दिसेल.
* दागिने निवडताना परंपरागत साडीसोबत टिकली, नथ, कानांमध्ये झुमके, खड्याच्या किंवा मोतीच्या बांगड्या, पायात जाडसर किंवा मोतूचे पैंजण व कमरेत झुमका या गोष्टींना प्राधान्य दिले तर तुम्ही सर्वांपेक्षा वेगळ्या दिसाल. हे दागिने सध्या कमी किंमतीत व परवडतील अशा भावात इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत.
* या सुंदर रूपावर तुम्हाला शोभेल व आवडेल अशी कोणतीही केशरचना करून स्वत:चे सौंदर्य वाढवा. चेहर्‍याच्या ठेवणीनुसार सैल वेणी, अंबाडा किंवा सागर वेणी यांची निवड करू शकता. या वेणीला बीड्स, मोती किंवा फुलानी सजवा.
* सगळ्यात शेवटी चेहर्‍याचा मेकअप करा. सगळ्यात आधी चहर्‍यावर बर्फ चोळा. याने तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहील. नंतर चेहर्‍यावर मॉयश्चराइजर लावा. नंतर तुमच्या रंगाला शोभून दिसेल त्या रंगाचे फाउंडेशन लावा. कॉम्पॅट पावडरने चेहर्‍याला 'एक्स्ट्रा टच' द्या. नंतर टाल्कम पावडर लावा. कपाळावर व नाकावर ड्रेसाच्या रंगाला मँचिंग ब्लशर लावा. नंतर डोळवांवर आयशॅडो लावा.डोळ्यांना व्यवस्थित आकार देण्यासाठी आयलाइनर किंवा आय ब्रो पेंसिलचा वापर करा. नंतर पापण्यांवर मस्करा लावा. सगळ्यात शेवटी तुमच्या कपड्यांच्या रंगाशी मेळ खाणारी लिपस्टिक व सुंदर टिकली लावा. आता पहा सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळून रहातील. आणि हो तुमच्या चेहर्‍यावरील तुमचे हास्य तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उठावदार बनवेल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Independence Day 2026 Wishes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day 2026 Essay in Marathi स्वातंत्र्य दिन निबंध

Happy Independence Day 2026 Wishes Images स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा इमेज

श्रावण महिन्यात शनिवारी 'पारंपरिक कढी-खिचडी' बनवण्याची सुंदर परंपरा

स्वातंत्र्यदिन विशेष कुठलाही कृत्रिम रंग न वापरता बनवा ''तिरंगा हलवा रेसिपी''

पुढील लेख
Show comments