शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

beauty tips : शिकेकईत असणारे महत्त्वाचे अनेक गूण…

शिकेकई - फ़्रुट फॉर हेअर, म्हणजे केसांचे फळ.

शिकेकई, ह्या औषधी वनस्पतीची मोठ्याप्रमाणात लागवड भारतभरात आणि पूर्व अशियात सापडते. शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो.

शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत होते. ही वनस्पती उष्ण आणि कोरड्या कटिबंधात वाढणारी आहे. केसामधे कोंडा न होण्यासाठी शिकेकईचा खूपच उपयोग होतो. आजच्या युगात आपण इतके साबण शाम्पू विकत घेत असतो, पण शिकेकई हे एक नैसर्गिक बॉडी केअर आणि हेअर केअर प्रॉडक्टच आहे. त्याची सर कोणत्याही शाम्पू कंडिशनरला नाही. शिकेकई मधे नैसर्गिक तेल, नैसर्गिक शाम्पू आणि नैसर्गिक कंडिशनर असते.

 
WD
शिकेकई मधे खूप प्रमाणात सॅपोनिअन हे रसायन आढळते. सॅपोनियन हे नैसर्गिक द्रव्य आहे. ह्या द्रव्यामुळे फेस निर्माण होतो. त्यामधे स्वच्छतेला हातभार लावतील असे अंश असतात. हे रसायन नंतर साबण उत्पादनासाठी वापरले जाते.

शिकेकईचा वापर उन्हाळ्यात खूपच प्रभावी ठरतो. त्यामुळे डोक्याला एक थंडाई येते. शिकेकईच्या बरोबरीनी नागरमुथा, वाळलेली संत्राची साले, वाळवलेली मेंदीची पाने, ह्या गोष्टीही वाटल्या जातात. शिकेकई वापरायची असल्यास दळून आणलेली शिकेकई आदल्या दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात भिजवून ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती भांड्यातील शिकेकई उकळून घेतात. म्हणजे त्याचे सर्व सत्व एकजीव होते आणि त्याचा केसांवर खूप छान परिणाम होतो.