रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Beauty Tips : घनदाट आणि चमकदार केसांसाठी 5 सोपे उपाय

1.  केसांना धूळ, ऊन आणि प्रदूषणापासून वाचवा. यासाठी टोपी, स्कार्फ किंवा हेल्मेट वापरा.  रोज केस खुले सोडू नये.
 
2. आठवड्यातून दोनदा तरी तेलाची मालीश करावी ज्याने केसांना पोषण मिळेल. आणि केस धुण्याआधी मोकळे सोडावे.
 
3  दिवसभरात केसांना 3 वेळा विंचरा. कारण केसात गुंता झाल्यावर त्यांची तुटण्याची भीती असते. ज्याने केसांचा दाटपणा कमी होतो. पण ओले केस विंचरू नये. केसांना तुटण्यापासून वाचविण्यासाठी खालील बाजूपासून विंचरायला सुरू करा.
 

4.  केसांना केमिकल कलरिंग करणे नुकसान करेल. रंग केसांचे पोषण नष्ट करून त्यांना ड्राय करतात. परिणामस्वरूप केसांचा दाटपणा कमी होतो आणि चमकही जाते. वाटल्यास प्राकृतिक रंग वापरू शकता.
 
5. केसांना चमकदार आणि दाट ठेवण्यासाठी योग्य आहार घ्या. नारळ, सोया, राजगिरा, डाळी संत्रं, व इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.