शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated: मंगळवार, 18 मे 2021 (09:45 IST)

उन्हाळ्यात मेंदी लावण्याचे फायदे

उन्हाळ्यात सर्वच त्रासलेले असतात. एक-दोनदा पाऊस पडल्यावरही अनेकदा उन्हाळा प्रखर जाणवतो. या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी काही न काही प्रयत्न करतच असतो. जेणे करून स्वतःला ताजे ठेवता येईल आणि उष्णतेपासून आराम मिळू शकेल. आपल्याला माहीत आहे का ? की या पासून आपल्या हातांवर लागणारी मेंदी आपल्याला उष्णतेपासून आराम मिळवून देते.
 
होय, आपण मेंदीचा वापर करून चांगले सुंदर केस तर मिळवूच शकता या व्यतिरिक्त तीव्र उष्णतेपासून होणाऱ्या त्रासांपासून देखील स्वतःला वाचवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या केसांवर मेंदी लावल्याचे आपल्याला काय फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर जाणून घेऊया तीव्र उष्णतेतून मेंदी आपल्याला कसे आराम देण्यास मदत करू शकते?
 
मेंदी कशी वापरावी ?
दही आणि मेंदी रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे मिश्रण आपल्या केसांना लावून किमान 1 तास ठेवा. नंतर धुऊन घ्या.
मेंदीमध्ये चहाचे पाणी, लिंबाचा रस, दही मिसळून रात्र भर ठेवावे. सकाळी वापरावे. वाळल्यावर धुऊन घ्या.
मेंदीमध्ये आवळा, रिठा आणि शिककाई पावडर मिसळा. त्याचबरोबर दही, लिंबाचा रस कॉफी पावडर आणि चहाचे पाणी मिसळा. रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी केसांना लावा.
या पैकी कोणताही मिश्रण लावणे फायदेशीर ठरेल. हे आपण आठवड्यातून एकदा वापरू शकता.
 
मेंदी लावण्याचे फायदे
तीव्र उन्हाळ्यात आपल्या डोक्याला मेंदीमुळे थंडावा मिळतो.
ह्याचा वापर आपल्याला फ्रेश ठेवण्यास मदत करतं.
मेंदीचे अँटीसेप्टिकचे गुणधर्म असतात. आपल्या केसांच्या समस्या असल्यास जसे की कोंडा होणे, खाज येणे आणि केसांच्या गळती पासून सुटका होईल.
मेंदीमध्ये दही मिसळल्याने हे उन्हाळ्यात खूप उपयोगी ठरतं.
ह्या मध्ये असलेले प्रथिनं आणि व्हिटॅमिन केसांना सर्व पोषक तत्त्व देतात त्यामुळे केस मुळांपासून घनदाट आणि चमकदार बनतात.
हे लावल्याने केसांना चमक येते आणि केसांची कंडिशनिंग देखील होते.