1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
  4. benefits of using Multani mitti on your hair

केसांवर मुलतानी माती वापरण्याचे फायदे जाणून घ्या

multani mitti
multani mitti
स्त्रिया बर्‍याचदा त्यांच्या स्किन केअर रूटीनमध्ये मुलतानी मातीचा समावेश करतात.मुलतानी माती केसांसाठीही तितकेच फायदेशीर आहे.यात शोषक गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते तुमच्या टाळूवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास उपयुक्त ठरते. एवढेच नाही तर ते तुमच्या स्कॅल्पही कंडिशन करते. यामध्ये अनेक प्रकारची खनिजे आढळतात, ज्यामुळे टाळूला फायदा होतो.

केसांमध्ये मुलतानी माती वापरण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या.

1 केसांना कंडिशन करणे- 

मुलतानी माती हेअर वॉश वापरण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे हे केसांना कंडिशन करते तसेच त्यातील घाण काढून टाकते. विशेषत: कुरळे केस असल्यास, मुलतानी मातीचे कंडिशनिंग गुणधर्म केस मॅनेजेबल बनवतात.

2 खराब झालेले केस रिपेअर करणे- 

अनेकदा प्रयोग करण्यासाठी लोक केसांवर केमिकल ट्रिटमेंट करून घेतात. पण केमिकल्समुळे केसांना खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, मुलतानी माती वापरणे केसांसाठी चांगले आहे. हे आपल्या केसांच्या मुळाला पोषण आणि मजबूत करण्यास मदत करते. ज्यामुळे केस गुळगुळीत आणि मुलायम होतात. तसेच रासायनिक उपचारांमुळे खराब झालेले केस दुरुस्त करण्यात मदत होते.

3 स्कॅल्पचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे -

मुलतानी मातीचा वापर केल्याने केवळ खराब झालेले केस दुरुस्त करण्यातच मदत करण्याशिवाय हे स्कॅल्प चे होणारे नुकसान देखील टाळते. मुलतानी मातीचा हेअर क्लिन्झर म्हणून वापर केल्याने स्कॅल्प स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्यामुळे स्कॅल्पवर असलेले जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होतात.  
 

4 केस फॉलिकल्स बळकट करणे -

मुलतानी मातीमध्ये अनेक प्रकारची खनिजे आणि पोषक तत्वे आढळतात. यामुळे ते डोक्यातील कोंडा आणि मृतत्वचा काढून टाकून स्कॅल्प निरोगी बनवून केसांची वाढ सुधारण्यासाठी केसांच्या फॉलिकल्स बळकट करते. केसांसाठी मुलतानी मातीचा वापर केल्यास केस मजबूत होतात आणि कमी तुटतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Priya Dixit 
 
 
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा
पुढील लेख
Career in B.Tech in Information Technology (IT): बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, जाणून घ्या