बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

रोज सेवन करा केशर व वेलचीचे पाणी, एक आठवडयात चमकेल चेहरा

Cardamom water
वेलचीमधील गुण त्वचेसाठी फायदेशीर असतात. तसेच केशर त्वचेला उजाळपणा देते. केशर आणि वेलचीचे पाणी त्वचेला मऊ आणि सुंदर बनवते. वेलची आणि केशरचे पाणी एक अस अमृत आहे, जे आपल्या त्वचेला लाभदायक आहे. हे दोन्ही घरगुती उपाय आहे. जे आपल्याला उजळ आणि आरोग्यदायी त्वचेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी मदत करतात. या पाण्याचे नियमित सेवन केल्याने आपल्या त्वचेमध्ये उजळपणा येतो आणि आपण तरूण आणि आरोग्यदायी दिसतो. चला तर जाणून घेऊ या वेलची आणि केशरच्या पाण्याचा उपयोग   
 
वेलचीचे पाणी- वेलचीचे पाणी एक अद्भुत त्वचा संजीवनी आहे. यामध्ये अनेक गुण असतात जे आपल्या त्वचेला आरोग्यदायी आणि चमकदार बनवतात. वेलचीमध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट्स त्वचेसाठी फायदेशीर आहे. जे त्वचेला उन, प्रदूषण आणि तणावमुळे होणाऱ्या नुकसान पासून सुरक्षित ठेवते. वेलचीमध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट्स त्वचेला तरूण बनवतात आणि त्वचेवरील काळे डाग आणि मरूम यांना दूर ठेवतात. वेलचीचे पाणी हे त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते. तसेच नविन ऊर्जा भरण्याचे काम करते. वेलचीचे पाणी सेवन केल्यास त्वचेचा रंग सुधारतो. यामुळे त्वचा उजळते आणि सुंदर बनवते. याशिवाय हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉइस्चराइजरच्या रुपात काम करते. जे त्वचेला मऊ आणि सुंदर बनवते. 
 
केशरचे पाणी- केशरचे पाणी एक नैसर्गिक उपाय आहे. जे आपल्या त्वचेला उजळायला मदत करते. केशरमधील  अँटीऑक्सीडेंट्स त्वचेला आराम प्रदान करतात. केशरचे नैसर्गिक रंग त्वचेला सुंदर बनवतात. हे त्वचेवरील डाग आणि मुरुम कमी करतात तसेच त्वचा स्वच्छ व्हायला मदत होते. केशरचे पाणी त्वचेसाठी एक चांगले मॉइस्चराइजर देखील आहे. हे त्वचेला नरम आणि मऊ बनवते तसेच त्वचेतील ओलावा देखील टिकवून ठेवते. केशरला 15 मिनिटांपर्यंत उकळवा. वेलचीमधील दाणे बारीक करून पाण्यामध्ये टाका. आता या पाण्याला पाच मिनिट अजुन उकळवा. पाणी उकळल्यानंतर ते गाळून घ्या. चमकदार त्वचेसाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik