1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (23:47 IST)

ऑइली स्कीनसाठी काकडीचे फेस मास्क

beauty tips
ऑइली स्कीनवर डाग आणि पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. उन्हाळ्यात तर ऑइली स्कीनची अधिक काळजीची गरज भासते. म्हणून उन्हाळ्यात काकडी हा त्वचेसाठी सर्वोत्तम उपाय आहे. याने त्वचा यंग दिसू लागले. काकडीचे काही घरगुती पैका तयार करून आपण त्वचेवर लावू शकता.
 
 
काकडी, हळद आणि लिंबू
एका वाटीत 1 चमचा हळद, अर्धा कप काकडीचा पल्प आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे चेहर्‍यावर लावून घ्या. 15 मिनिटाने पाण्याने धुऊन टाका. यात वाटल्यास अंड्याचा पांढरा भागही मिसळू शकता.
 
काकडी आणि दही
या दोन्हींची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटाने कोमट पाण्याने धुऊन टाका.
 
काकडी आणि मुलतानी माती
मुलतानी मातीत काकडीचा रस मिसळून पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा. वाळल्यावर धुऊन टाका.
 
काकडी आणि ओटमील
1 चमचा ओटमील आणि किसलेली काकडी यात 2 चमचे ताक मिसळा. यात लिंबाचा रस मिसळा. ही घट्ट पेस्ट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिट लावू राहू द्या. कोमट पाण्याने धुऊन टाका.
 
काकडी आणि कोरफड
1 चमचा कोरफड जेल किंवा त्याचा रसात एक चतुर्थांश चमचा काकडीचा रस मिसळा. चेहरा आणि मानेवर लावून 15 मिनिटासाठी राहू द्या. कोमट पाण्याने धुऊन टाका.
 
काकडी आणि बेसन
2 चमचे बेसनामध्ये काकडीचा रस मिसळून चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटाने पाण्याने धुऊन टाका.