ग्रीन नेल थियरी तुमचे आयुष्य बदलू शकते का, काय आहे हे
आजकाल सोशल मीडियावर एक अनोखा सौंदर्य ट्रेंड व्हायरल होत आहे, ज्याला 'ग्रीन नेल थियरी' असे म्हणतात. या सिद्धांतानुसार, जर तुम्ही तुमचे नखे हिरव्या रंगाने सजवले तर ते केवळ सुंदरच दिसत नाही तर तुमच्या आयुष्यात शांती, संपत्ती, आरोग्य आणि उत्कर्ष आणू शकते. हा ट्रेंड विशेषतः तरुणांमध्ये वेगाने पसरत आहे.
या पूर्वी लाल आणि निळ्या रंगासाठी देखील असेच सिद्धांत व्हायरल झाले आहे. खरच नखांचे रंग आपले नशीब पालटतात का?
सध्या सोशल मीडियावर ग्रीन नेल थियरी हा ट्रेंड व्हायरल होत आहे. त्याला ग्रीन नेल थेरी म्हणतात. या मध्ये लोक त्यांचे नखे हिरव्या रंगाने रंगवत आहे. कारण हिरवा रंग हा शांती, समृद्धी, आरोग्य आणि उत्कर्ष आणतो. असे मानले जाते. हा ट्रेंड विशेषतः जनरेशन झेड आणि मिलेनियल्स मध्ये लोकप्रिय आहे. या आधी रेड आणि ब्लु रंग देखील ट्रेंडिंग मध्ये होते. लाल नखांच्या सिद्धांतानुसार, लाल नखे एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण दर्शवतात, तर निळ्या नखांच्या सिद्धांतानुसार जे लोक नातेसंबंधात असतात त्यांना निळा रंग जास्त आवडतो.असे मानले जाते.
नखांचा सिद्धांत खरोखर काम करतो का?
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, अशा सिद्धांतांना कोणताही ठोस आधार नाही. पण तरीही बरेच लोक त्यांचा अवलंब करतात कारण त्यांचा अवलंब केल्याने प्लेसिबो इफेक्ट म्हणजेच सकारात्मक विचारसरणीचा परिणाम जाणवतो. लोकांचा असा विश्वास आहे की विशिष्ट रंग परिधान केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या जवळ आणतो. ग्रीन नेल थेरी महिलांना स्वतःसाठी विचार करण्यास, स्वावलंबी होण्यास आणि आरामदायी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करते.
हिरव्या, लाल आणि निळ्या रंगांव्यतिरिक्त, इतर काही नखांच्या रंगांचेही स्वतःचे सिद्धांत आहेत. काळ्या नखांचा सिद्धांत सांगतो की काळे नखे शक्ती आणि गूढता आणि आत्मविश्वास निर्माण करतात. पांढऱ्या नखांच्या सिद्धांतानुसार, पांढरे नखे दर्शवतात की ती व्यक्ती अविवाहित आहे आणि नवीन नात्यासाठी तयार आहे. दुसरीकडे, गुलाबी नखे सिद्धांत कोमलता आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते, जे एक आनंदी आणि सकारात्मक प्रतिमा तयार करते.
Edited By - Priya Dixit