1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

पुरळ आले आहेत का? कडुलिंबाचे 2 फेसपॅक करतील मदत, त्वचा होईल चमकदार

काही नैसर्गिक वस्तू त्वचेसाठी फायदेशीर असतात. ज्यांमध्ये एक आहे कडुलिंब. कडुलिंबात अनेक औषधीय गुण असतात. जे आरोग्यासोबत सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम, पुरळ आले असतील तर हा घरगुती नैसर्गिक कडुलिंबाचा फेसपॅक नक्की ट्राय करा. 
 
पुरळसाठी कडुलिंबाचा उपयोग कसा करावा?  
ऑईली त्वचा आणि पुरळसाठी कडुलिंब वापरण्याचे अनेक प्रकार आहेत. याशिवाय त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचेसाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा नक्कीच उपयोग करू शकतात. 
 
*कडुलिंब आणि चंदन फेसपॅक 
2 मोठे चमचे कडुलिंब पावडर 
2 मोठे चमचे चंदन पावडर 
1 मोठा चमचा गुलाब जल 
गरजेनुसार पाणी 
 
कृती 
कडुलिंब आणि चंदन पावडर मिक्स करावी यामध्ये मोठा चमचा गुलाबजल टाकावे. हे मिश्रण मिक्स करावे. मग या फेसपॅकला चेहऱ्यावर लावावे. तसेच 20 मिनिट लावून नंतर थंड पाण्याने धुवावे.  
 
*कडुलिंब आणि हळद स्क्रब  
1 मोठा चमचा कडुलिंब पावडर 
2 चमचे बेसन 
1/2 चमचा हळद 
1/2 चमचे गुलाबजल 
 
कृती 
बेसन, हळद आणि कडुलिंबाची पावडर मिक्स करावी मग यामध्ये गुलाबजल टाकवे. तसेच 20 मिनिट राहू दिल्यानंतर थंड पाण्याने धुवावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik